लॉकडाऊनमुळे NRI बेघर, मुंबईतील मजूर आणि भिकाऱ्यांच्या रिलीफ कॅम्पमधून घेतोय मदत

लॉकडाऊनमुळे NRI बेघर, मुंबईतील मजूर आणि भिकाऱ्यांच्या रिलीफ कॅम्पमधून घेतोय मदत

राज्यभरात 262 रिलीफ कॅम्प तयार करण्यात आले असून येथे गरजुंना जेवणं पुरवलं जात आहे

  • Share this:

मुंबई, 31 मार्च : कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) राज्य सरकारकडून रिलीफ कॅम्प (Relief Camp) तयार करण्यात आले आहेत. मजूर, बेघर व भिकाऱ्यांसाठी राज्यभरात 262 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. यामध्ये 70000 हून अधिक जणांना मदत मिळाली आहे.

पालिकेच्या अशाच एका रिलीफ कॅम्पमध्ये भिकाऱ्यांबरोबर एक NRI आढळून आला आहे. ब्रिटेनमध्ये राहणारे विशाल जैन मुंबईत आले होते. ते आपले सामान क्लॉक रुममध्ये ठेवून शहरात होते. यादरम्यान 24 मार्च रोजी लॉकडाऊनची घोषणा झाली. ते 24 तारखेपासून रिलीफ कॅम्पमध्ये आहेत. त्यांचे कुटुंबीय हरियाणा येथे असून लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था बंद असल्याने ते तेथे जाऊ शकत नाही. मुंबईत यांच कोणी नसल्याने त्यांचे हाल झाले आहेत. एनडीटीव्ही वृत्त वाहिनीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

संबंधित - कोरोनाच्या लढ्यासाठी केवळ महिन्याचा नाही, माझा संपूर्ण वर्षाचा पगार घ्या

मुंबईतील अंधेरी स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये तयार केलेल्या बीएमसीच्या या रिलीफ कॅम्पमध्ये तब्बल 75 बेघर लोक राहत आहेत. ज्यांना अंधेरीतील स्थानिक तरुण भोजन व पाणी देत आहेत. तरुणांचं म्हणणं आहे की विशाल यांना स्वत:लाही वेगळं राहायचं नाही. संपूर्ण राज्यात अशी 262 रिलीफ कॅम्प तयार करण्यात आली आहेत. जेथे 70 हजारहून जास्त लोक राहत आहेत. लॉकडाऊनमुळे दुसऱ्या राज्यात काम करणाऱ्या अनेक मजुरांचे राहण्याचे हाल झाले होते. अनेकांनी तर कित्येक किलोमीटर पायी प्रवास करीत आपलं घर गाठलं. यामुळे राज्य सरकारने राज्यभरातील विविध भागांमध्ये या गरजुंसाठी रिलीफ कॅम्प उभारले आहेत. येथे त्यांची खाण्याची व राहण्याची व्यवस्था केली जाते.

संबंधित - कोरोनाविरुद्धच्या लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईंनीही दिली देणगी

First published: March 31, 2020, 8:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading