मुंबई 26 ऑगस्ट: कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन लावल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका वाहतुकदारांना बसला आहे. गेल्या 5 महिन्यांपासून वाहनं बंद असल्याने लाखो लोकांचा रोजगारच बुडाला आहे. त्यामुळे गाड्यांचे हजारो रुपयांचे टॅक्स चुकवायचे कसे असा प्रश्न या व्यवसायिकांकडे होता. त्या सगळ्यांना राज्य सरकारने दिलासा देत मोठा निर्णय घेतला असून 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2020 पर्यंत संपूर्ण टॅक्समध्ये माफी देण्यात आलेली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली.
सरकारने 6 महिन्यांचा त्यांचा हा टॅक्स माफ केलेला आहे. या निर्णयाचा फायदा हा 11 लाख 40 हजार एवढ्या वाहनांना मिळेल. या निर्णयाचा सरकारच्या तिजोरीवर 700 कोटी रुपयांचा भार येईल. या वाहतूकदारांची मागणी होती की कोरोनाच्या काळामध्ये आम्ही बिलकुल धंदा केलेला नाही आणि आम्ही पूर्ण आर्थिक संकटात आहोत.
त्या संकटातून सावरण्यासाठी त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे असंही परब म्हणाले. आज मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारनं घेतलेले मोठे निर्णय....
-राज्याच्या शहरी भागातील आरोग्य सेवेसाठी ७ नियमित पदांच्या निर्मितीस मान्यता. संचालक, उपसंचालक आणि सहाय्यक संचालक या पदांचा समावेश.
MPSC च्या परीक्षाबाबत घेतला मोठा निर्णय; ठाकरे सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा
-राज्यातील मच्छिमारांना मिळणार विशेष सानुग्रह अनुदान, मंत्रिमंडळाकडून अनुदान देण्यास मान्यता.
-वार्षिक कर भरणाऱ्या सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक वाहनांना 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी मिळणार करमाफी. टाळेबंदीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर निर्णय.
राष्ट्रवादीमुळे शिवसैनिकांवर अन्याय, राजीनामापत्रात खासदाराची व्यथा
-मुंबईसह मोठ्या शहरात घर घेणाऱ्यांना सरकारने दिलासा दिलाय.मुद्रांक शुल्कात म्हणजेच स्टॅम्प ड्युटी registration मध्ये कपात करणयात आली आहे. आणि तीही 3 टक्के. डिसेंबर पर्यंत 3 टक्के आणि 1 जानेवारी ते 31मार्च2021 या काळात 2 टक्के इतकी सवलत देण्यात आली आहे.
-टाळेबंदीमुळे अतिरीक्त होणाऱ्या दूधापैकी प्रतिदिन १० लाख लिटर दुध स्विकारणे आणि रुपांतर योजना ऑक्टोबरपर्यंत राबविण्यास मान्यता.