14 दिवसांच्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, आज-उद्या CM घोषणा करतील- बाळासाहेब थोरात

14 दिवसांच्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, आज-उद्या CM घोषणा करतील- बाळासाहेब थोरात

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी अशी माहिती दिली आहे की राज्यात वाढणारी कोरोना रुग्णसंख्या पाहता 14 दिवसांच्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही.

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल: महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी अशी माहिती दिली आहे की राज्यात वाढणारी कोरोना रुग्णसंख्या पाहता 14 दिवसांच्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. आज किंवा उद्या मुख्यमंत्री याबाबत घोषणा करतील अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. बाळासाहेब थोरात यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, मुख्यमंत्री याबाबत अंतिम एसओपी करत आहेत. गरीब लोकांना काय दिलासा देता येईल याबाबत सरकार विचार करत असल्याचं ते म्हणाले.

कोरोनामुळे आज राज्यभर अत्यंत साधेपणाने गुढीपाडवा (Gudhi Padwa 2021) साजरा केला जात आहे. बाळासाहेब थोरात यांच्या मुंबईतील घरी साधेपणाने पाडवा साजरा केला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अशी प्रार्थना केली की, 'गेलं वर्ष आणि हे वर्ष देखील कोरोना मध्ये गेलं आहे. राज्य संकटात आहे. राजकारणात चढ उतार होत असतात पण राजकारण हे लोकांसाठी करतो असतो. कोरोनाचे संकट दूर होवो.'

(हे वाचा-'कोर्ट'मधील लोकशाहीर काळाच्या पडद्याआड,वीरा साथीदार यांचा कोरोनामुळे झाला मृत्यू)

त्यांनी अशी माहिती दिली की, गेले दोन दिवस मुख्यमंत्री ठाकरे हे राज्यातील महत्त्वाच्या मंत्र्यांसह चर्चा करत असून राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्री कार्यातील सचिव आशिष सिंग तसेच आपत्कालीन विभागाचे सचिव असीम गुप्ता यांसह काही वरिष्ठ सनदी अधिकारी कडक नियमावली करण्याबाबत काम करत आहेत.

राज्यात लॉकडाऊन जाहीर करत असतानाच गोरगरीब लोकांना फटका बसणार नाही तसंच परप्रांतीय लोकांना त्यांच्या राज्यात जायचं आहे त्यांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी कालावधी दिला जाई अशीही माहिती थोरातांनी दिली. महाराष्ट्रामध्ये जे गोरगरीब लोकं आहेत त्यांना राज्य सरकार आणि केंद्र सरकारने तर मदत केली तर काही आर्थिक मदत सुद्धा करता येईल. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी मोलमजुरी करणाऱ्या कामगारांना खात्यांमध्ये सहा हजार रुपये द्यावे अशी अशी मागणी केली आहे. आर्थिक मदती करता राज्य सरकार अनुकुल असून केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत करणे आवश्यक असल्याचे थोरात म्हणाले.

महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नागपूर, औरंगाबाद, नगर, सांगली आणि पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत. याठिकाणी योग्ये सेवा सुविधा देणे, ऑक्सिजन बेड उपलब्ध करणे, आय सी यु बेड्स उपलब्ध करून देणे यावर सरकार लक्ष केंद्रित करत असून  रेमडिसिव्हीर इंजेक्शन्स उपलब्ध करून देणे ही राज्य सरकारची प्राथमिकता असून त्यासाठी योग्य प्रयत्न सुरू असल्याचही थोरात म्हणाले.

(हे वाचा-Ground Report: 'ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो', वसई-विरारचं भीषण वास्तव)

कोरोनाबाधित  (Corona) देशात सर्वाधिक अधिकृत रुग्ण संख्या महाराष्ट्राची (Maharashtra corona cases)  आहे. त्यामुळे भविष्यातील कोविड 19 (Covid 19) संसर्ग विस्फोट टाळण्यासाठी राज्य सरकार सलग काही दिवस कडक लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) लावण्याच्या पवित्र्यात आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकार 2.0 लॉकडाऊनची नियमावली दोन दिवसांत जाहीर करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, राज्यात सलग दोन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन घोषित होणार आहे.

गेल्या वर्षीप्रमाणे अती कडक लॉकडाऊन न लावता, सर्वसामन्य नागरिकांना जीवनावश्यक गोष्टींसाठी सूट देत आणि हातावर पोट असणाऱ्या अति-गरीब वर्गातील नागरिकांना, काही प्रमाणात आर्थिक मदत करण्यासंदर्भातही नियोजन राज्य सरकार करत असल्याची माहिती मिळत आहे. कोविड 19 संसर्गाची ही दूसरी लाट पहिल्या लाटेच्या तिप्पट तीव्रतेची असल्याचं चित्र दिसतंय. त्यामुळे राज्यातील कोविड 19 संसर्गाची दूसरी लाट नियंत्रणात आणण्यासाठी कडक लॉकडाऊनची गरज निर्माण झाली आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: April 13, 2021, 12:32 PM IST

ताज्या बातम्या