इंग्लंडच्या दरबारात ज्यांचे झाले कौतुक, ते हात आता फोडत आहेत दगड!

इंग्लंडच्या दरबारात ज्यांचे झाले कौतुक, ते हात आता फोडत आहेत दगड!

रेल्वेनं प्रवास करण्याकरता आणि डब्बे नेण्याकरता डब्बेवाल्यांना परवानगी देण्यात आली पण मुंबईतील जवळपास सर्वच कार्यालये अजूनही बंद आहेत.

  • Share this:

मुंबई, 04 नोव्हेंबर : 'अशीच परिस्थिती राहिली तर डब्बे वाटपाचे काम सोडून मिळेल ते काम करावे लागेल' अशी व्यथा मुंबईतील डब्बेवाल्यांनी (mumbai dabbawala)व्यक्त केली आहे. मुंबई (Mumbai) पुर्णत: अनलॉक न झाल्याने डब्बेवाल्यांचा व्यवसाय सुरू होवून देखील बंद असल्या सारखी परिस्थिती आहे. कारण, रेल्वेने (Mumbai Local) मुंबईत कामाकरता येणाऱ्यांची संख्या अजूनही खूप कमी असल्याने तसंच  खाजगी कार्यालये बंद  असल्याने डब्बेच येत नाही. परिणामी डब्बेवाले पुर्णत: हताश झाले आहे.

'लवकरात लवकर सरकारने काही तरी करावे नाही तर आम्हाला मिळेल ते काम करुन घर चालवावं लागेल' हे तेच डब्बेवाले आहेत, ज्यांचे कौतुक इंग्लंडच्या राजकुमाराने केले होते. हे तेच डबेवाले आहेत ज्यांची ख्याति जगप्रसिद्ध आहे. पण कोरोनामुळे आज हेच डबेवाले रस्त्यावर आले आहे.

...मोडला नाही कणा! घर चालवण्यासाठी 120 किमीचा सायकल प्रवास करून विकतोय मिठाई

अशोक रोंधळ (वय 55) हे गेली कित्येक वर्षे  मुंबईतील शेकडो चाकरमान्यांना रोज डब्बे देत होते. पण कोरोनामुळे लॉकडाउन झाला आणि भुतो न भविष्य ओढवले एवढे मोठे संकट त्यांच्यावर ओढावले आणि ते करत असलेल्या डब्बेवाला व्यवसायाला एक प्रकारे खिळच बसली आहे. अशोक हे सध्या मुंबईतील खाजगी खानावळ वाल्यांचे डब्बे पोहोचवण्याचे काम करत आहे.

अशोक यांच्या सारखीच गणपत यांची देखील परिस्थिती आहे. गणपत किराना माल पोहोचवण्याचे काम करतात. त्यातून त्यांना कधी 150 तर 250 रुपये रोज मिळतो. त्यातच ते आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. बहुतांश सर्वच डब्बेवाल्यांवर आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे बहुतांश डब्बेवाले हे लॉकडाउनमुळे गावाला गेले आहे ते अजूनही परत मुंबईला आले नाहीत. तर गावाला संसाराचा गाडा चालवण्यासाठी हे डब्बेवाले शेतात आणि बांधावर रोजंदारीवर काम करत आहे.

Birthday Special: हिप्पीपासून वेश्येपर्यंत तब्बूने साकारल्या आऊट ऑफ बॉक्स भूमिका

रेल्वेनं प्रवास करण्याकरता आणि डब्बे नेण्याकरता डब्बेवाल्यांना परवानगी देण्यात आली पण मुंबईतील जवळपास सर्वच कार्यालये अजूनही बंद आहेत. त्यात सामान्य चाकरमान्यांना रेल्वेनं प्रवास करण्याची परवानगी नाही. त्यामुळे डब्बेवाले डब्बे देणार तरी कोणाला असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच डब्बेवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

Published by: sachin Salve
First published: November 4, 2020, 3:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या