कल्याण-डोंबिवलीतही केली लॉकडाऊनची घोषणा, कोरोनाचं थैमान रोखण्यासाठी निर्णय

कल्याण-डोंबिवलीतही केली लॉकडाऊनची घोषणा, कोरोनाचं थैमान रोखण्यासाठी निर्णय

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जवळपास 5000 च्या आसपास पोहोचली आहे.

  • Share this:

कल्याण, 30 जून : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यासह अनेक मोठ्या महानगरपालिकांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. मात्र तरीही कल्याण डोंबिवलीत मात्र लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली नव्हती. त्यामुळे झालेल्या टीकेनंतर आता अखेर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने लॉकडाऊन जाहीर केला आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जवळपास 5000 च्या आसपास पोहोचली आहे. त्यामुळे पालिकेने 2 जुलै ते 12 जुलैला सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊन काळात महापालिका क्षेत्रात केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्यात आली आहे. तसंच या काळात सार्वजनिक वाहतूकही बंद राहणार आहे.

लॉकडाऊनवरून मनसेने केली होती टीका

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात रोज कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यांना वेळेवर बेड मिळत नाहीत. त्यामुळे लॉकडाऊन करा अशी मागणी नागरिक,सामाजिक संस्था यांच्याकडून केली जात होती. या मागणीवरून मनसे आमदार राजू पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. ठाणे,अंबरनाथमध्ये कडक लॉकडाऊन केला आहे. मग केडीएमसीमध्ये का नाही, असा सवाल त्यांनी केला होता. मात्र आता पालिकेने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.

ठाण्यातही लॉकडाऊन

Unlock च्या पहिल्या टप्प्यातच ठाणे शहरातही रुग्णसंख्येत वेगाने वाढ झाली, हे लक्षात घेऊन महापालिकेने 10 दिवस संपूर्ण टाळेबंदी (Complete Lockdown)करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुरुवार 2 जुलै सकाळी 7 वाजल्यापासून ते 12 जुलै सकाळी 7 पर्यंत संपूर्ण ठाणे शहरात टाळेबंदी लागू होईल. फक्त अत्यावश्यक सेवांसाठी बाहेर जाणाऱ्या नागरिकांनाच रस्त्यावर उतरण्याची परवानगी देण्यात आली आहे. या काळात सामान्य नागरिकांनी अत्यंत आवश्यक असेल तरच बाहेर पडावं, असं महापालिकेतर्फे सांगण्यात आलं आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: June 30, 2020, 10:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading