लॉकडाउन 4.0 ची लवकरच घोषणा, त्याआधी राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

लॉकडाउन 4.0 ची लवकरच घोषणा, त्याआधी राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

चौथ्या लॉकडाऊनचा कार्यकाळात राज्य सरकारने मात्र, अधिक शिथील करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार, महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • Share this:

 मुंबई, 17 मे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. आज लॉकडाउनचा तिसरा टप्पा संपणार आहे. चौथ्या टप्प्यात काय बदल केले जाणार आहे, याबद्दल लवकरच घोषणा केली जाणार आहे. परंतु, राज्य सरकारने  चौथ्या टप्प्यात अधिक अटी शिथील करण्याची तयारी केली आहे.

लॉकडाऊन वाढता वाढता वाढे अशीच परिस्थिती सर्वत्र दिसत असताना चौथ्या लॉकडाऊनचा कार्यकाळात राज्य सरकारने मात्र, अधिक शिथील करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार, आता काही महत्त्वाचे निर्णय राज्य सरकार घेत असल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारच्या वतीने 18 मे पासून ग्रीन ऑरेंज आणि रेड झोन क्षेत्रात आरटीओ सब रजिस्टार शासकीय कार्यालय जनतेसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला जात आहे.

रेड झोन क्षेत्रांमध्ये प्रतिबंधित क्षेत्र जर शासकीय कार्यालय येत असतील तर ते बंद राहतील, अशा स्वरूपाचे आदेश राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी काढले आहेत.

हेही वाचा -तब्बल दीड महिन्यानंतर सुखद बातमी! मालेगावात 617 पैकी 428 कोरोनारुग्ण झाले बरे

लॉकडाउन कालावधी चौथा जवळपास निश्चित आहे. महाराष्ट्रामध्ये कोविड-19 रुग्णसंख्या मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव, औरंगाबाद, सोलापूर आणि नागपूर या प्रमुख शहरात वाढताना दिसतच आहे. ही प्रमुख शहरं रेड झोन क्षेत्रात येत असून या शहरांमध्ये प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अटी शिथील न करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.

मात्र, शहरातील काही भागांमध्ये जिथे रुग्ण आढळले नाहीत अशा भागांमध्ये सूट देण्याचा जवळपास निर्णय राज्य सरकार घेत असल्याचं समजतं आहे. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात लोकं शहरी भागातून ग्रामीण भागात स्थलांतर करत आहेत. अशा काळात ग्रामीण भागांमध्ये सुद्धा अधिक कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

हेही वाचा -धक्कादायक! औरंगाबाद जेलमध्ये लघुशंकेला उठलेल्या तरुण कैद्यासोबत अनैसर्गिक कृत्य

शहरी भागातून ग्रामीण भागामध्ये जी लोकं स्थलांतरित होणार आहेत, त्यांना विलगीकरण करण्यात येणार आहे. ग्रामीण भागांमध्ये जिथे ग्रीन आणि ऑरेंज झोन आहेत या क्षेत्रात रुग्ण संख्या वाढू नये यासाठी देखील नवे काही कायद्यात बदल करण्याच्या हालचाली सरकारी पातळीवर सुरू आहेत.

संपादन - सचिन साळवे

First published: May 17, 2020, 1:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading