थर्टी फर्स्ट निमित्त 'हे' आहे लोकलचं स्पेशल टाईमटेबल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पनवेलसाठी आणि पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी रात्री दीड वाजता शेवटची लोकल सोडली जाणार आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 31, 2017 06:02 PM IST

थर्टी फर्स्ट निमित्त  'हे' आहे लोकलचं स्पेशल टाईमटेबल

31 डिसेंबर:  थर्टी फर्स्ट असल्यानं आज सगळीकडेच मोठा उत्साह पाहायला मिळतोय. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सगळेच सज्ज झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने विशेष लोकल्सची सोय केली आहे.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन आज रात्री दीड वाजता शेवटची लोकल कल्याणकडे रवाना होईल.  यासोबतच कल्याणहून रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी रात्री दीड वाजता शेवटची लोकल सुटेल.. हार्बर रेल्वेवरही आज विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पनवेलसाठी आणि पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी रात्री दीड वाजता शेवटची लोकल सोडली जाणार आहे.

विरारहून सुटणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक

रात्री १२.१५ वा.ची लोकल चर्चगेटला रात्री १.४७ वा. पोहोचेल

रात्री १२.४५ वा.ची लोकल चर्चगेटला रात्री २.१७ वा. पोहोचेल

रात्री १.४० वा.ची लोकल चर्चगेटला पहाटे ३.१२ वा. पोहोचेल

Loading...

पहाटे ३.०५ वा.ची लोकल चर्चगेटला पहाटे ४.३७ वा. पोहोचेल

 

चर्चगेटहून सुटणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक

रात्री १.१५ वा.ची लोकल विरारला पहाटे २.५५ वा. पोहोचेल

रात्री २ वा.ची लोकल विरारला पहाटे ३.४० वा. पोहोचेल

रात्री २.३० वा.ची लोकल विरारला पहाटे ४.१० वा. पोहोचेल

पहाटे ३.२५ वा.ची लोकल विरारला पहाटे ५.०५ वा. पोहोचेल

मध्य रेल्वेच्या गाड्यांचं वेळापत्रक

सीएसएमटीहून रात्री १.३० वा.ची लोकल कल्याणला पहाटे ३ वाजता पोहोचेल

कल्याणहून रात्री १.३० वा.ची लोकल सीएसएमटीला पहाटे ३ वाजता पोहोचेल

हार्बरवरील गाड्यांचं वेळापत्रक

सीएसएमटीहून रात्री १.३० वा.ची लोकल पनवेलला पहाटे २.५० वा. पोहोचेल

पनवेलहून रात्री १.३० वा. ची लोकल सीएसएमटीला रात्री २.५० वा. पोहोचेल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 31, 2017 06:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...