मध्य रेल्वेवर लोकलच्या फेऱ्या वाढणार, सकाळच्या वेळी महिलांचे डबे वाढणार

सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी महिलांसाठीचे डबे वाढणार आहेत.

सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी महिलांसाठीचे डबे वाढणार आहेत.

  • Share this:
26 आॅक्टोबर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांना किंचितसा दिलासा मिळालाय. आता मध्य रेल्वे मार्गावर 18 गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. मुंबईची लाईफलाईन असलेल्या मध्य रेल्वेवर रोज या ना त्या कारणामुळे अडचणींना सामना करावा लागतो. त्यातच सकाळची वेळ असेल तर लोकलमध्ये चढणेही मुश्किल असते. यावर तोडगा म्हणून मध्य रेल्वेनं खास सकाळच्या वेळी लोकलच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. आता एकूण फेऱ्यांची संख्या 1688 हून 1706 होणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी महिलांसाठीचे डबे वाढणार आहेत. तसंच आणखी काही जलद गाड्यांना दिव्याला थांबा मिळणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी एक नोव्हेंबरपासून होणार आहे.
First published: