रुळाची पाहणी करणाऱ्या रेल्वे इंजिनिअरचा लोकलच्या धडकेत मृत्यू

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते कल्याण आणि ठाकुर्ली दरम्यान पत्रिपूलाजवळ रेल्वे रुळांची पाहणी करत होते. त्याचवेळी हा अपघात झाला.

News18 Lokmat | Updated On: Jul 31, 2019 09:45 PM IST

रुळाची पाहणी करणाऱ्या रेल्वे इंजिनिअरचा लोकलच्या धडकेत मृत्यू

कल्याण 31 जुलै :  रेल्वे अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. आज लोकलच्या धडकेत रेल्वेच्या इंजिनिअरचा मृत्यू झाला. रेल्वे रुळाची पाहणी सुरू असताना त्यांना लोकल आल्याचं लक्षात आलं नाही त्यामुळे रुळावरून बाजूला होत असतानाच लोकलने त्यांना धडक दिली. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. विमलकुमार राय असं त्या इंजिनिअरचं नाव आहे. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते कल्याण आणि ठाकुर्ली दरम्यान पत्रिपूलाजवळ रेल्वे रुळांची पाहणी करत होते. त्याचवेळी हा अपघात झाला. राय यांचा मृतदेह कल्याणच्या रुक्मिणी बाई हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला असून रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. अपघाताची चौकशी कल्याण जीआरपी करत आहे.

मुंबईत पोलीस स्टेशनमध्ये साजरा झाला चक्क गुंडाचा वाढदिवस, 5 पोलीस निलंबीत

मध्ये रेल्वे वरील सर्वांत गर्दीचे ठिकाण म्हणून ठाणे रेल्वे स्थानक ओळखले जाते. तर डोंबिवली हे दुसरं तसचं गर्दीचं स्थानक आहे. मात्र या दोन स्थानकांदरम्यान प्रवास हा मृत्यूचा सापळा ठरलाय. या 25 मिनिटांच्या प्रवासात या मार्गावर दररोज तीन अपघात होतात आणि त्यात किमान 2 प्रवाशांचा मृत्यू होतो अशी माहिती RTIमध्ये उघड झालीय.

मध्ये रेल्वेवर जास्त अपघात

डोंबिवली रेल्वे स्थानकात सोमवार ते शनिवार अशी सहा दिवस  प्रवाशांची तोबा गर्दी असते त्यात जरा ट्रेनला उशीर झाला की आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते. मात्र यामुळे नाहक बळी जातो तो रेल्वे प्रवशांचा. रोज रेल्वेनं प्रवास करत कामावर जाणारी आपली व्यक्ती घरी सुखरुप परत येईल का? हा प्रश्न प्रवाशांच्या कुटूंबीयांना पडतो. आणि आता तर माहिती अधिकारातून समोर आलेली माहिती धक्कादायक आहे.

Loading...

हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है - मुख्यमंत्री

डोंबिवली ते ठाणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धडकी भरवणारी माहिती आहे. सामाजिक कार्यकर्ते सिद्देश देसाई यांना माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहिती नुसार रोज किमान 2 प्रवाशांचा डोंबिवली ते ठाणे प्रवास करताना धावत्या लोकल मधून पडून मृत्यू होतो असं स्पष्ट होतंय.

ही आहेत अपघाताची कारणं

ठाणे ते दिवा रेल्वे प्रवास करताना जानेवारी 2018 ते मे 2019 पर्यंत 257 प्रवासी धावत्या लोकल मधून पडून जखमी झालेत.

ठाणे ते दिवा रेल्वे प्रवास करताना जानेवारी 2018 ते मे 2019 पर्यंत 279 प्रवासी धावत्या लोकल मधून पडून मृत्यूमुखी पडलेत.

खरं तर गेली कित्येक वर्षे प्रवासी संघटना, रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलीस यांच्या मार्फत डोंबिवली ते ठाणे दरम्यान अपघात का होतात याची कारणे शोधून ब्लॅक स्पॉट शोधून काढलेत.

डोंबिवली ते कोपर दरम्यान जुना लोखंडी पुल आणि धावत्या रेल्वेत कमी अंतर असल्याने तिथे अपघात होतात

कोपर ते दिवा दरम्यान भोपर नाल्यावर ट्रॅकवरुन चालणारे नागरीक अपघातग्रस्त होतात.

साथ लढेंगे! EVMविरुद्धच्या मोर्च्यात राज ठाकरेंचं 'दीदीं'ना मुंबईत येण्याचं आवतन

कोपर ते दिवा दरम्यान शंकरा मंदीर जवळ धावत्या लोकल मधील प्रवाशांच्या हातावर काठीने फटके मारल्याने अनेक प्रवाशांचा मृत्यू झालाय.  दिवा ते मुंब्रा दरम्यान वळणाचा ट्रॅक असल्याने गर्दीच्या वेळेस रेल्वेच्या दरवाज्यात लटकणारे प्रवासी या वळणावर गाडी येतात झटका लागतो आणि तोल जावून प्रवासी पडतात.कळवा रेल्वे स्थानकावरील फुट ओव्हर ब्रीजचा वापर न करता प्रवासी लोकं थेट रेल्वे रुळ क्रॉस करतात यामुळे अनेक प्रवाशांचा मृत्यू होतो.

ही कारणं जशी प्रवाशांच्या अपघात आणि मृत्यूला कारणीभूत आहेत तसच उशीरा धावणारी लोकल सेवा हेही एक मुख्य कारण आहे. एखाद्या लोकलला थोडा जरी उशीर झाला तरी गर्दीत प्रचंड वाढ होते आणि लोक लटकून प्रवास करतात. त्यामुळं प्रवाशांचा अपघात होतो. त्याचबरोबर मानवी चुकाही अपघाताला कारणीभूत आहेत. प्रवाशांनीही काळजी घेतली तर अपघाताचं प्रमाण कमी होऊ शकतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2019 09:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...