News18 Lokmat

मोबाईल अॅपद्वारे लोकलचं तिकीट खरेदी करणाऱ्यांना आता 5 टक्के सूट !

लोकलने प्रवास करण्यासाठी आता खूशखबर आहे. मोबाईल अॅपद्वारे जे मुंबईकर लोकलचं तिकीट खरेदी करतात त्यांना आता 5 टक्के सूट मिळणारा आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 23, 2018 01:29 PM IST

मोबाईल अॅपद्वारे लोकलचं तिकीट खरेदी करणाऱ्यांना आता 5 टक्के सूट !

मुंबई, 23 मे : बातमी आहे मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी. लोकलने प्रवास करण्यासाठी आता खूशखबर आहे. मोबाईल अॅपद्वारे जे मुंबईकर लोकलचं तिकीट खरेदी करतात त्यांना आता 5 टक्के सूट मिळणारा आहे. रोज तिकीट काढण्यासाठी भल्या मोठ्या रोगंत उभं राहण्याचा त्रास याने कमी होणार आहे.

मोबाईल अॅपद्वारे तिकीट खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वेने हे पाऊल उचललं आहे. त्यामुळे आता लोकलच्या तिकीट रांगेतून मुंबईकरांची सुटका होण्याची शक्यता आहे. या निर्णयाचं सर्व प्रवाशांकडून स्वागत करण्यात आलं आहे. कारणं याचा सर्वात जास्त फायदा होतो तो घाईच्या वेळेस. आधीच उशिर झालेला असतो आणि त्यात त्या तिकीटाच्या रांगेत उभं राहण्यात प्रवाशांचा खूप वेळ जातो. पण आता थोड्या प्रमाणात का होईना तो त्रास कामी होणार आहे असं म्हणायला हरकत नाही.

हजार रूपयांचा हंगामी पास घेतल्यास त्यावर 50 रुपयांची सवलत मिळणार आहे. पश्चिम रेल्वेकडून रोज 9 लाखांची तिकीट विक्री केली जाते. मात्र 7 हजार 500 तिकीटांची खरेदी मोबाईल अॅपद्वारे होत असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 23, 2018 01:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...