मुंबई, 14 जुलै : मुंबईची लाईफलाईन असलेले लोकल सेवा (mumbai local) निर्बंध शिथिल केल्यानंतर सुद्धा सर्वसामान्य मुंबईकरांसाठी बंदच आहे. लशीचे (corona vaccine) दोन डोस घेतले असतील लोकल प्रवासासाठी मुभा द्यावी अशी मागणी होत होती, पण राज्य 3 लेव्हलमध्ये असल्यामुळे कोणतीही सूट दिली जाणार नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिली आहे.
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. राज्यमंत्रिडळाच्या या बैठकीत निर्बंध शिथिल करण्यावर चर्चा झाली. निर्बंध शिथिल केले जाईल अशी शक्यता होती, पण जैसे थेच परिस्थिती ठेवण्यावरच सरकारला कल पाहण्यास मिळाला आहे.
राज्यात पावसाचा जोर कायम; मुंबईसह 12 जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट
'राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देशाच्या तुलनेत कमी आहे. गेल्या 3 आठवड्यात रुग्ण संख्या स्थिर आहे. पण 10 जिल्ह्यांमध्ये 92 टक्के रुग्ण आहे. त्यामुळे लेव्हल ३ मध्ये अनेक जिल्हे आहे. त्यामुळे राज्यात निर्बंध शिथिल करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही', असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
तसंच, ज्या व्यापाऱ्यांनी लशीचे दोन डोस घेतले आहे. त्यांनी दुकानं खुले ठेवण्याबाबत मागणी केली होती. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांमध्ये निर्णय घेणार आहे, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.
सॉरी गुड्डी...लेकीसाठी लिहिले हे अखेरचे शब्द,FBपोस्ट करत प्राध्यापकाची आत्महत्या
'कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र नागरिकांनी मोठ्या प्रमाणाक गर्दी करायला सुरुवात केली आहे. तज्ज्ञांनी कोरोना साथीच्या तिसर्या लाटेचा इशारा दिल्यानंतरही लोक खबरदारी घेत नाहीत. राज्यांनी घातलेले निर्बंध शिथिल केल्यानंतर लोक पर्यटनस्थळे आणि बाजारपेठेत मोठी गर्दी करत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे पालन होत नसेल तर तर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करा, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिल्या आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिली.
तसंच, विमान मार्गे महाराष्ट्रात येणाऱ्या व्यक्तीनी लशीचे दोन डोस घेतले असतील तर परवानगी आहे. RTPCR टेस्ट ऐवजी ज्यांनी लसीकरणाचे 2 डोस घेतले असतील ते प्रमाणपत्र दाखवले तर हवाई मार्गे महाराष्ट्रात यायला परवानगी आहे, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai local