मुंबई, 2 जानेवारी : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत असल्याची माहिती आहे. सायन स्थानक इथं तांत्रिक बिघाड झाल्यानं लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे.
लोकल वाहतूक उशिरा सुरू असल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर 'न्यूज18 लोकमत'ने रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ही वाहतूक कधीपर्यंत पूर्वपदावर येईल, याबाबत प्रशासनाकडून अजूनपर्यंत कसलीही माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशीच लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईकरांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकदा तांत्रिक बिघाड आणि रेल्वे प्रशासनाकडून सूचना देण्याबाबत होत असलेला विलंब, याबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Special Report : अवघ्या 2 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं...