माहीमजवळ लोकलचे डबे घसरले, 3 जण जखमी

माहीमजवळ लोकलचे डबे घसरले, 3 जण जखमी

डबे घसरल्यामुळे सीएसटीकडून पश्चिम रेल्वेकडे जाणारी विस्कळीत पूर्णपणे विस्कळीत झालीये.

  • Share this:

मुंबई, 25 आॅगस्ट :  हार्बर मार्गावरून पश्चिमकडे जाणारी रेल्वेचे डबे घसरले आहे. या दुर्घटनेत 3 जण जखमी झाले. डबे घसरल्यामुळे सीएसटीकडून पश्चिम रेल्वेकडे जाणारी विस्कळीत पूर्णपणे विस्कळीत झालीये.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून अंधेरीकडे जाणाऱ्या लोकलचे  4 डबे  माहीम स्टेशनजवळ घसरले.  सकाळी 9.55 मिनिटांनी ही घटना घडलीये. सुदैवाने आज गणेशचतुर्थीची सुट्टी असल्यामुळे लोकलला गर्दी नाहीये. त्यामुळे झालेल्या अपघातात  कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. मात्र या दुर्घटनेत 3  जण जखमी झाले,   जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2017 10:46 AM IST

ताज्या बातम्या