Home /News /mumbai /

काँग्रेसमध्ये बदलाचे वारे, मुंबईच्या जागेसाठी दिल्लीत जोरदार लॉबिंग!

काँग्रेसमध्ये बदलाचे वारे, मुंबईच्या जागेसाठी दिल्लीत जोरदार लॉबिंग!

विद्यमान अध्यक्ष गायकवाड मुंबई महापालिका निवडणूक आधी बदलावे, अशी भूमिका काही नेत्यांची आहे.

मुंबई, 17 डिसेंबर : महाविकास आघाडी सरकारला (MVA Goverment) वर्ष पूर्ण झाले आहे. एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. तरदुसरीकडे काँग्रेसमध्येही (Congress) हालचालींना वेग आला आहे. मुंबईच्या अध्यक्षपदासाठी ( Congress president in Mumbai ) दिल्लीत जोरदार लॉबिंग सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी मुंबईतील काही नेत्यांनी दिल्लीवारी केल्याचे उघड झाले आहे. विद्यमान काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या ऐवजी अन्य कोण याबाबत लॉबिंग यासाठी प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस नेते दिल्लीत काँग्रेस वरिष्ठ नेत्यांना भेटून आल्याची माहिती आहे. खूशखबर! या महिन्याच्या अखेरपर्यंत 6 कोटी PF लोकांच्या खात्यात येतील पैसे विद्यमान अध्यक्ष गायकवाड मुंबई महापालिका निवडणूक आधी बदलावे, अशी भूमिका काही नेत्यांची आहे. गायकवाड हे अध्यक्ष असून तितके सक्रीय नाही. त्यामुळे त्याच्या जागी अन्य व्यक्तीची निवड करावी असा मतप्रवाह एका गटांचा आहे. तर गायकवाड यांनी मनपा निवडणूक काळात मुस्लिम आणि दलित मतदारांसाठी संघटनात्मक काम केल्याचा दावा हायकमांड समोर मांडण्यात आल्याची माहिती आहे. OMG! व्हेलची कोट्यवधींची उलटी समजून मायलेकीनं घरी आणली वस्तू आणि झाला स्फोट शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या वडील एकनाथ गायकवाड यांच्यासाठी लॉबिंग करत आहे तर अस्लम शेख हे अमरजित मनहंस यासाठी प्रयत्न करतात. अशोक चव्हाण यांनी भाई जगताप याच्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. पुढील काही दिवसात मुंबई प्रदेश काँग्रेस पातळींवर संघटनात्मक बदल होणे अपेक्षित असून त्याआधी वर्षा गायकवाड, अस्लम शेख दिल्लीवारी करत लॉबिंग करत आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते चरणसिंग सप्रा तसंच माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांची देखील मुंबई कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी नावं चर्चेत आहेत. सुरेश शेट्टी हे दक्षिण भारतातील असून दक्षिण मतदारांवर आकर्षित करण्याचा विचार प्रयत्न आहेत. तसंच दिलेल्या कामांमध्ये सुद्धा आता दक्षिणात्य नेत्यांचे वर्चस्व अधिक दिसत आहे, याचा नेमका फायदा सुरेश शेट्टी यांना मिळतो का हे पाहणे गरजेचे आहे. तर दुसरीकडे चरणसिंग सप्रा देखील उत्तर भारतातील नेत्यांच्या माध्यमातून मुंबई काँग्रेस अध्यक्षपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आहे. भविष्यात मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकासआघाडी एकत्रित निवडणूक न लढवता स्वतंत्र निवडणूक लढावी अशी काँग्रेसच्या काही नेत्यांची इच्छा आहे.  तर मुंबई महापालिकेची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजप आणि शिवसेना यांना सक्षम चेहरा काँग्रेसला देणे अतिशय गरजेचे आहे. मागील दोन महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा नगरसेवकांची संख्या 50 वरून आज 30 पर्यंत आली आहे. काँग्रेसला लागलेली उतरती कळा भविष्यात थांबून महाविकासआघाडीमधील सत्तेचा योग्य उपयोग करत काँग्रेसचे कात टाकत वाढवणे हे मोठं आव्हान मुंबई काँग्रेस अध्यक्ष समोर असणार आहे. त्यामुळे दिल्ली हायकमांड नेमकी काय भूमिका घेते, याकडे आता लक्ष आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या