• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • Live Updates: एसटी कर्मचारी संघटनेची मान्यता रद्द नाही, निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती

Live Updates: एसटी कर्मचारी संघटनेची मान्यता रद्द नाही, निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | January 25, 2022, 18:28 IST
  LAST UPDATED 4 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:48 (IST)

  मुंबई - मालाडच्या क्रीडा संकुल मैदानाचा नामकरण वाद, वीर टिपू सुलतान क्रीडा संकुल फलक जागोजागी, मैदान प्रवेशद्वारावरही अधिकृत फलक, पोलिसांचा बंदोबस्त, मुंबईच्या अनेक भागातील पोलीस कुमक दाखल, प्रजासत्ताकदिनी संध्याकाळी नव्या नावासह लोकार्पण, भाजप आणि विश्व हिंदू परिषदेनं घेतला आक्षेप, मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख नामकरणावर ठाम

  20:54 (IST)

  प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात रोषणाई, राष्ट्रपती भवनावर झगमगाट तर मुंबईतही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आणि महापालिकेवर तिरंग्याची झळाळी

  20:52 (IST)

  अहिल्या अभ्यासिकासमोर विद्यार्थ्यांचं आंदोलन
  86 जणांना मुख्य परीक्षेसाठी बसण्यास परवानगी
  बाकी उमेदवारांना परवानगी नाकारल्यानं आंदोलन

  20:15 (IST)

  2022 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
  ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रेंना पद्मविभूषण पुरस्कार
  जनरल बिपीन रावतांना मरणोत्तर पद्मविभूषण
  कल्याण सिंग यांना मरणोत्तर पद्मविभूषण
  राधेश्याम खेमका यांना मरणोत्तर पद्मविभूषण
  बालाजी तांबेंना मरणोत्तर पद्मश्री जाहीर
  सिरमचे संस्थापक सायरस पुनावालांना पद्मभूषण
  हिंमतराव बावसकर, लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाणांना 'पद्मश्री'
  गायक सोनू निगम यांना पद्मश्री पुरस्कार
  विजयकुमार डोंगरेंना पद्मश्री पुरस्कार
  डॉ.भीमसेन सिंघल यांना पद्मश्री पुरस्कार
  व्हिक्टर बॅनर्जींना पद्मभूषण पुरस्कार
  उद्योजक नटराजन चंद्रशेखर यांना पद्मभूषण
  गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण पुरस्कार

  19:54 (IST)

  राज्यातील महाविद्यालयं 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार
  2 डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार

  19:50 (IST)

  औरंगाबाद - संत एकनाथ नाट्यगृहाचं लोकार्पण
  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नाट्यगृहाचं ऑनलाईन उद‌्घाटन
  औरंगाबादमध्ये लवकरच येणार - उद्धव ठाकरे
  पालिकेवरचा भगवा उतरू देणार नाही - मुख्यमंत्री
  औरंगाबादला सर्व सुविधा देणार - उद्धव ठाकरे
  'उद्यानं आणि नाट्यगृहांकडे लक्ष द्यायला हवं'
  औरंगाबाद शहर आता फार बदललंय - मुख्यमंत्री
  'विमानतळाला संभाजी महाराजांचं नाव द्यावं'
  हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आहे - मुख्यमंत्री
  'जनतेची सेवा करताना राजकारण करू नये'

  19:26 (IST)

  भाजपनं शिवसेनेविरोधात दंड थोपटले
  मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजप आक्रमक
  भाजपपुढे सर्व पर्याय खुले, सर्व पर्यायांवर चर्चा
  स्वबळावर सत्तेसाठी प्रयत्न करा - देवेंद्र फडणवीस
  'शिवसेनेविरोधात आक्रमक पवित्रा घ्या'
  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे आदेश

  19:21 (IST)

  मनसेसोबत युती न करण्याबाबत भाजपच्या सर्व कोअर सदस्यांचं एकमत, ज्या छोट्या पक्षांसोबत युती केली जाईल त्यांना भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवावी लागेल, मनपा निवडणुकीसाठी विविध कमिट्या गठित करणार - सूत्र

  19:17 (IST)

  किरीट सोमय्यांना नगरविकास विभागाची नोटीस
  मंत्रालयातील फाईल चाळतानाचा फोटो व्हायरल

  19:14 (IST)

  मैदानाचं नामकरण 'टिपू सुलतान' करण्यावरून वाद
  उद्या माझ्या मतदारसंघात 3 कार्यक्रम - अस्लम शेख
  'टिपू सुलतान हे मैदानाचं नाव बऱ्याच वर्षांपासून'
  वीर टिपू सुलतान नावाला अचानक विरोध का? - शेख
  काँग्रेस फक्त विकास करतंय, राजकारण नाही - शेख
  'ज्या लोकांनी आपल्या देशासाठी त्याग केलाय...'
  त्यांचं नाव द्यायला काही हरकत नसावी - अस्लम शेख
  'काही संघटना सुपारी घेऊन राजकारण करतायत'
  मुंबईचं दुर्भाग्य की शहरात गार्डन नाही - अस्लम शेख

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स