सावधान! मुसळधारमुळे मुंबईची झाली तुंबई; 'या' ठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंद

सावधान! मुसळधारमुळे मुंबईची झाली तुंबई; 'या' ठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंद

मुंबई, ठाणे आणि उपनगरामध्ये सोमवारपासून (2 सप्टेंबर)दमदार पाऊस सुरू आहे. आज पहाटेदेखील मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे.

  • Share this:

मुंबई, 4 सप्टेंबर : मुंबई, ठाणे आणि उपनगरामध्ये सोमवारपासून (2 सप्टेंबर)दमदार पाऊस सुरू आहे. आज पहाटेदेखील मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. तसंच पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.बंगलाच्या उपसागरात आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पश्चिम किनारपटटी, मुंबई तसंच महाराष्ट्राच्या काही भागात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस अपेक्षित आहे, अशी माहिती कुलाबा वेधशाळेकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासांत मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पुढील दोन ते तीन दिवस मान्सून राज्यभरात सक्रिय राहील. गुरुवारनंतर पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

नागरिकांना समुद्र किनारी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. मुंबईची लाइफ लाइन असणाऱ्या रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिरानं सुरू आहे. ठाणे, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबई, वसई, विरार, पालघरमध्ये पावसाचा जोर कायम आहे.

LIVE UPDATE :

- सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे

- दोन तासानंतर अंधेरीहून दादरला जाणारी लोकल सुटली

- अंधेरीपर्यंत जाणाऱ्या गाड्या जोगेश्वरी ते अंधेरीदरम्यान थांबवल्या आहेत

- ठाणे : गायमुख घोडबंदर रोड येथे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे स्लो-फास्ट दोन्ही रेल्वे  मार्गावरील वाहतूक ठप्प. दादर ते कुर्ला, वडाळा ते कुर्ला सर्व ट्रॅकवर साचलं पाणी, हिंदमाता परिसरात पाणी साचल्यानं पुलाखालील वाहतूक बंद

(पाहा : PHOTO : मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई, पाहा हे 10 फोटो)

पावसाची नोंद

- बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात  सकाळी आठ ते दुपारी दोन या कालावधीत सर्वाधिक पावसाची नोंद ही महापालिकेच्या के पूर्व (अंधेरी पूर्व) विभाग कार्यक्षेत्रात झाली असून या परिसरात २१४.३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

- शहर भागात सर्वाधिक पाऊस दादर परिसरात झाला असून तिथे 168.15 मीमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. या खालोखाल वडाळा परिसरात 158.97, धारावी परिसरात 148.58, रावळी कॅम्प परिसरात 139.2 एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. तर हिंदमाता परिसराचा समावेश असलेल्या एफ दक्षिण विभागात 113.78 मीमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे‌. मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे याच कालावधीत एकूण 69.35 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे

(पाहा : RED Alert! राज्याच्या या 5 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा)

- पूर्व उपनगरांमध्ये  सर्वाधिक म्हणजे 184.17 मिलिमीटर पावसाची नोंद विक्रोळी परिसरात झाली आहे. या खालोखाल कुर्ला परिसरात 147.84 मिलिमीटर, भांडुप परिसराचा समावेश असणाऱ्या एस विभागात 144.02 मीमी,  चेंबूर परिसरात 132.07, तर घाटकोपर परिसराचा समावेश असलेल्या एन विभागामध्ये 124.95 मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.

- पश्चिम उपनगरांमध्ये सर्वाधिक पाऊस अंधेरी पूर्व परिसरात 214.35 मिलीमीटर, के पश्चिम विभागात म्हणजेच प्रमुख्याने अंधेरी पश्चिम परिसरात 200.17 मिलिमीटर, मरोळ परिसरात 183.38, विलेपार्ले 182.87, तर कांदिवली परिसरात 170.67 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

नालासोपारा

नालासोपारा

- मिठी नदीच्या पाण्याची पातळी वाढली

- कुर्ला परेलमध्ये एनडीआरएफच्या टीम तैनात, पुण्याहून आणखी दोन टीम पनवेल आणि रायगडकडे रवाना

- आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडा, सखल भागात पाणी साचल्याने पालिकेचं नागरिकांना आवाहन

-दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातही पावसाची संततधार कोल्हापुरात एकूण 15 बंधारे आतापर्यंत पाण्याखाली गेले असून पंचगंगा नदीची पाणीपातळी 23 फुटांवर आली आहे, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

-हार्बर रेल्वे : कुर्ला ते चुनाभट्टीदरम्यान लोकलसेवा बंद

- ठाणे-सीएसएटी रेल्वेसेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद,  ठाणे ते कल्याण आणि कल्याण ते ठाणे धीमी वाहतूक सुरू पण या गाड्याही अर्धा ते एक तास उशिराने असतील - मध्य रेल्वे

- नालासोपारा ते विरार आणि विरार ते वसई रेल्वे रुळावर पाणी आल्याने लोकल सेवा बंद.  विरार ते डहाणूच्या दिशेने आणि वसईच्या पुढे ट्रेन सुरू असल्याची नालासोपारा स्टेशन मास्तरांची माहिती

मुंबईत वाहतूक कोंडी

मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. कुर्ल्यातील एलबीएस मार्गवर पाणी साचल्यानं बीकेसी, विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, पवईकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

दरम्यान, मुंबईतील अनेक गणेश मंडपात पावसाचं पाणी साचल्यानं वीज प्रवाह बंद करण्याचं आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या वतीने सर्व गणेशोत्सव मंडळांना केलं आहे. मंडपात पाणी शिरल्यानं वीज प्रवाह पाण्यात उतरू शकतो. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून वीज प्रवाह बंद करण्याचं आवाहन केले गेलं आहे.

(वाचा : 'PM मोदींना न घाबरता चर्चा करेल, अशा नेत्याची देशाला गरज'; BJPच्या दिग्गज नेत्याचं विधान)

पनवेलला पावसानं झोडपलं

पनवेल शहारालाही पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. पनवेल, खारघर, कळंबोली, कामोठे आणि सायन-पनवेल महामार्गावरही पावसाचं पाणी साचलं आहे.

गडचिरोलीत गावांचा संपर्क तुटला

गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्याचा संपर्क अजूनही तुटलेलाच आहे. जवळपास 100 गावांचा संपर्क तुटला आहे. मंगळवारी (3 सप्टेंबर)पर्लकोटा नदीसह बांडीया नदीला पूर आल्याने मोठा पूल पाण्याखाली बुडाला आहे तसंच कुमरगुडा नाल्याचा पूल देखील पाण्याखाली गेल्याने या भागातल्या गावांसह तालुक्याचा संपर्क तुटला होता. अजूनही हीच परिस्थिती कायम आहे.

भिवंडीत जोरदार पाऊस

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडीमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचलं झालं आहे. तीनबत्ती बाजार पेठेतील 100 हून अधिक दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे.

(वाचा : फडणवीस आणि मोदी नाही...उदयनराजेंच्या मते 'हे' लोक आहेत खरे CM आणि PM)

पालिका आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पालिकेच्या आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गणेशोत्सवादरम्यान पालिकेच्या उर्दू शाळा तसंच खासगी इंग्रजी शाळांनाही गणपतीची सुट्टी नसते. पण पावसाचा जोर पाहता आज सर्व शाळांना प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

(वाचा : मंदीमुळे लोक रस्त्यावर येतील,त्यांनाही गोळ्या घालणार काय? उद्धव ठाकरेंचा सवाल)

कोयना धरणात पाण्याची आवक वाढली

महाबळेश्वर जिल्ह्यात मुसळाधार पावसामुळे कोयना धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे कोयना धरणाचे दरवाजे दोन फुटांवरून तीन फुटांवर  उचलण्यात आले आहेत.  धरणातून  30 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 105 क्षमतेच्या कोयणा धरणात 104.5 टीएमसी पाणीसाठा सध्या आहे.

VIDEO: मुसळधार तावसामुळे 100 गावांचा संपर्क तुटला, इतर महत्त्वाच्या टॉप 18

First Published: Sep 4, 2019 11:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading