LIVE: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आमटे कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना व्हायरस आणि महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाइव्ह अपडेट

  • News18 Lokmat
  • | February 25, 2021, 22:50 IST |
    LAST UPDATED 2 YEARS AGO

    हाइलाइट्स

    22:48 (IST)

    - सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण
    - गेले 7 दिवस ताप खोकला होता. परवा कोरोना टेस्ट करण्यात आली होती. 
    - RTPCR टेस्ट निगेटिव्ह आली होती. पण ताप खोकला औषध घेऊन सुद्धा कमी होत नव्हता. म्हणून आज चंद्रपूरला चेकअप करण्यात आलं होतं 
    - सीटी स्कॅन आणि इतर ब्लड टेस्ट चेक अपमध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं

    22:8 (IST)

    चंद्रपूर - बांबू संशोधन-प्रशिक्षण केंद्र आगीची सीआयडी चौकशी करा, भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची मागणी, आशिया खंडातील सर्वात मोठ्या बांबू संशोधन-प्रशिक्षण केंद्राची राख म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचं मोठं नुकसान असल्याची प्रतिक्रिया, नैसर्गिक आग असेल तर खबरदारीच्या उपाययोजना का झाल्या नाहीत? -मुनगंटीवार

    22:0 (IST)

    पुणे - खेडच्या दावडी गावातली घटना
    सरपंच निवडीवेळी धिंगाणा घातल्याचा प्रकार
    चावडीवर नोटांची उधळण करत धुडगूस
    पैशाची उधळण करणं पडलं महागात
    दावडी गावातील 6 जणांवर गुन्हा
    राजगुरूनगर पोलिसात गुन्हा दाखल
    पोलिसांनी दाखवला कायद्याचा धाक
    पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांची माहिती

    21:30 (IST)

    मुंबईसह उपनगरात हाय अलर्ट, बेवारस गाड्यांच्या तपासणीचे आदेश, नाकाबंदी करून सुरक्षा चोख करा, पोलीस आयुक्तालयातून मुंबई पोलिसांना आदेश

    अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली टीम तयार, 3 डीसीपी करतायत प्रकरणाचा तपास, 20 पेक्षा जास्त वरिष्ठ अधिकारी तपासात सहभागी, तपासासाठी 7 टीम बनवल्या, मुंबई पोलीस वाहतूक विभागही सामील

    संशयित गाडीच्या माहितीसाठी RTO अधिकाऱ्यांची मदत, गाडीची नेमप्लेट आणि चेसी नंबर मॅच होत नाही, नंबरप्लेट बनावट असण्याची शक्यता

    19:57 (IST)

    राज्यात दिवसभरात 8,702 नवे रुग्ण
    राज्यात दिवसभरात 3,744 रुग्ण बरे
    राज्यात दिवसभरात 56 रुग्णांचा मृत्यू
    रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 94.49 टक्के
    राज्यात सध्या 64,260 ॲक्टिव्ह रुग्ण

    19:54 (IST)

    अहमदाबाद - भारत X इंग्लंड तिसरी कसोटी
    भारताची इंग्लंडवर दणदणीत मात
    भारताकडून इंग्लंडचा 10 विकेट्सनं धुव्वा
    दोन दिवसातच कसोटी सामन्याचा निकाल
    मालिकेत भारताची 2-1 अशी आघाडी

    19:44 (IST)

    घाबरून जाण्याचं कारण नाही -शंभुराज देसाई
    मुळाशी जाऊन मुंबई पोलीस शोध घेतील -शंभुराज देसाई

    19:38 (IST)

    मुंबई - कार मायकल रोडवर बेवारस कार
    संशयित वाहनाची कसून तपासणी सुरू
    स्थानिकांनी पोलिसांना दिली होती माहिती
    बराच वेळ उभी होती बेवारस कार
    पोलीस आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी

    19:3 (IST)

    पुणे - पोलिसांच्या नाकावर टिच्चून गजा मारणे मावळ कोर्टात हजर, कोर्टाकून जामीन मंजूर, 
    पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केला होता मिरवणुकीनंतर गुन्हा दाखल 
    तर पुणे पोलिसांनी मारणे फरार असल्याची काढली प्रेस नोट, 
    पोलिसांना न सापडणारा गजा मारणे जामीन घेऊन कोर्टातून बाहेर

    18:53 (IST)

    पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण
    भाजप युवा मोर्चाच्या वतीनं आंदोलन
    वानवडी पोलीस ठाण्यासमोर निदर्शनं
    'योग्य पद्धतीनं तपास करत नसल्याचा आरोप'
    'संजय राठोडांवर कारवाई करण्यात यावी'
    भाजप युवा मोर्चाकडून तक्रार अर्ज दाखल

    कोरोना व्हायरस आणि महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाइव्ह अपडेट