मुंबई, 04 जून : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray ) हे एका अपघातातून (Accident) थोडक्यात बचावले आहेत. सह्याद्री अतिथीगृहात (Sahyadri) मुख्यसभागृहाच्या बाहेर झालेल्या अपघातातून ते बाचवले. अतिथीगृहाच्या बाहेर असलेलं मोठं झुंबर पीओपी स्लँबसह (POP Slab) कोसळलं. अपघात झाला तेव्हा आदित्य ठाकरे आत बैठक घेत होते. त्यामुळं या घटनेतून ते थोडक्यात बचावले आहेत.
(वाचा-मराठा आरक्षण प्रकरणी मोठी बातमी: राज्य सरकार पुनर्विलोकन याचिका दाखल करणार)
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे शुक्रवारी सायंकाळी बैठकीच्या निमित्ताने सह्याद्री अतिथीगृहामध्ये आले होते. याठिकाणी पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांच्याबरोबर सभागृहात त्यांची बैठक सुरू होती. मात्र आतमध्ये ही बैठक सुरू असताना बाहेरच्या भागात असलेलं शोभेचं मोठं झुंबर त्यावरील पीओपी स्लँबसह कोसळलं. अचानक झालेल्या या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही. मात्र ही दुर्घटना अत्यंत गंभीर होती. त्यामुळं सह्याद्री अतिथीगृहातील सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या.
(वाचा-कोरोनामुळं भारतात अडकलेल्या विदेशी नागरिकांच्या व्हिसामध्ये 31 ऑगस्टपर्यंत वाढ)
दरम्यान, अपघात झाला त्याठिकाणचं बांधकाम हे 25 वर्षांपूर्वीचं आहे. या सर्व इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेलं आहे. त्या संपूर्ण इमारतीचा अहवाल मागवण्यात आला आहे. त्यानंतरच याबाबत प्रतिक्रिया देण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, संबंधित दुरुस्तीचं काम तातडीनं सुरू करण्यात आलं आहे.
हा अपघात बैठक सुरू असलेल्या सबागृहाच्या बाहेरच झाला. त्यामुळं या अपघाताच्या आधी नंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना आणि सर्व अधिकार्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलं. बैठकीसाठी काही वेळापूर्वी आदित्य ठाकरे या ठिकाणाहूनच आत गेले असल्याची शक्यता आहे. त्यामुळं थोडा वेळ चुकला असता तर अपघाताची शक्यता होती. मात्र सुदैवानं तसं झालं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aaditya thackeray, Accident