युतीत ठिणगी पडलेल्या या जागेवर भाजपचा मोठा विजय

युतीत ठिणगी पडलेल्या या जागेवर भाजपचा मोठा विजय

ईशान्य मुंबईतून मनोज कोटक दीड लाखांपेक्षा देखील जास्त मतांनी विजयी झाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 23 मे : मुंबईतील लक्षवेधी ठरलेल्या ईशान्य मुंबईच्या लढतीत अखेर भाजपच्या मनोज कोटक यांनी बाजी मारली आहे. कोटक दीड लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले आहेत. ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांना उमेदवारी देण्याकरता शिवसेनेनं विरोध केला होता. त्यानंतर भाजपनं मुंबईचे पालिका गटनेते मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. दरम्यान, मनोज कोटक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष आणि माजी खासदार संजय दिना पाटील यांनी आव्हान दिलं होतं.

सर्व राजकीय गणितं पाहता संजय दिना पाटील विरूद्ध मनोज कोटक लढत चुरशीची होईल असा अंदाज वर्तवला जात होता. पण, या लढतीत मनोज कोटक यांनी दीड लाखांपेक्षा देखील जास्त मतांनी विजय मिळवला आहे. संजय दिना पाटील यांचा लोकसभा निवडणुकीतील सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी 2014मध्ये देखील त्यांचा किरीट सोमय्या यांनी पराभव केला होता. ईशान्य मुंबईमध्ये मनसेची ताकद देखील आहे. पण, यावेळी मात्र राज ठाकरे फॅक्टर चालला नाही.

2014मध्ये सोमय्यांचा विजय

ईशान्य मुंबईत घाटकोपर, मुलंड, कांजुरमार्ग याठिकाणी गुजराथी मतदारांचं प्रमाण जास्त आहे. मनोज कोटक गुजराथी असल्याने त्याचा फायदा त्यांना इथे मिळू शकतो, अशी चर्चा होती. 2014च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील हेच इथून लढले होते. मोदी लाटेमध्ये त्यांचा जोरदार पराभव झाला आणि किरीट सोमय्या निवडून आले.

मनसेचं प्राबल्य

ईशान्य मुंबई मतदारसंघात भांडुप, मुलुंड अशा भागात मनसेचं प्राबल्य आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भांडुपला झालेली सभा आघाडीसाठी किती फायद्याची ठरेल अशी देखील चर्चा होती. राज ठाकरेंच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हा मुंबईच्या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा बनला होता. राज ठाकरे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य करत भाजप सरकारवर जोरदार टीका करत होते. याचा फटका या मतदारसंघात भाजपला जास्त बसू शकतो असं देखील राजकीय निरिक्षकाचं मत होतं. पण, राज ठाकरेंची जादू चाललीच नाही.


VIDEO : लोकसभेत विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 02:09 PM IST

ताज्या बातम्या