मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

दक्षिण मध्य मुंबईचा गड शिवसेनेनं राखला; राहुल शेवाळे विजयी

दक्षिण मध्य मुंबईचा गड शिवसेनेनं राखला; राहुल शेवाळे विजयी

दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेचे राहुल शेवाळे मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले आहेत.

दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेचे राहुल शेवाळे मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले आहेत.

दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेचे राहुल शेवाळे मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले आहेत.

मुंबई, 23 मे :  दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेनं बाजी मारली आहे. राहुल शेवाळे यांनी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला आहे. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर मुंबईतील या लढतीकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं होतं. पण, राहुल शेवाळे यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. 2014मध्ये देखील राहुल शेवाळे विजयी झाले होते. दक्षिण मध्य मुंबई म्हणजे दादर, माहीम यासारखा शहरी मध्यमवर्गीयांचा भाग आणि धारावीमधले कष्टकरी गरीब लोक असा संमिश्र स्वरूपाचा राखीव मतदारसंघ आहे. या भागात शिवसेनेची देखील ताकद असून राहुल शेवाळे यांचा संपर्क देखील दांडगा होता. शिवाय, सेना - भाजप युती झाल्याचा फायदा देखील राहुल शेवाळे यांना झाला. पुन्हा आमनेसामने 2009 मध्ये इथे काँग्रेसचे एकनाथ गायकवाड निवडून आले होते. त्यानंतर 2014 मध्ये राहुल शेवाळेंनी एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला. आता पुन्हा एकदा हेच उमेदवार आमनेसामने होते. दक्षिण मध्य मुंबईमध्ये माहीम, चेंबूर, सायन कोळीवाडा, धारावी, वडाळा, अणुशक्तीनगर या विधानसभा जागा येतात. या सगळ्या मतदारसंघात आघाडी आणि युतीचाही कस होता. पण, अखेर राहुल शेवाळे यांनी बाजी मारली आहे. मनसे फॅक्टर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हाही मुंबईच्या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा बनला होता. राज ठाकरे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य करत भाजप सरकारवर जोरदार टीका करत होते. त्यामुळे दक्षिण मध्य मुंबईत राज ठाकरे यांच्या सभांमुळे शिवसेना भाजप युतीचं नुकसान होईल का, अशी चर्चा इथे रंगली होती. पण, राज ठाकरे यांची जादू दक्षिण मध्य मुंबईत देखील चालली नाही. VIDEO : पार्थच्या पराभवामुळे आजोबा दुखावले, अजितदादांचा उल्लेखही टाळला!
First published:

Tags: Lok sabha election 2019, Mumbai South Central S13p30

पुढील बातम्या