उत्तर -पश्चिम मुंबई लोकसभा निकाल 2019 : संजय निरुपमांची सरशी होणार? गजानन कीर्तिकर गड राखणार?

उत्तर -पश्चिम मुंबई लोकसभा निकाल 2019 : संजय निरुपमांची सरशी होणार? गजानन कीर्तिकर गड राखणार?

उत्तर -पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात संजय निरुपमांची सरशी होणार? गजानन कीर्तिकर गड राखणार? याकडे लक्ष लागून राहिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 23 मे : उत्तर -पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून कोण बाजी मारणार? संजय निरुपमांची सरशी होणार? गजानन कीर्तिकर गड राखणार? याकडे लक्ष लागून राहिलं आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांनी काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांचा पराभव केला होता. पण, यंदा मात्र काँग्रेसनं मुंबईचे माजी अध्यक्ष संजय निरूपम रिंगणात उतरले आहेत.

उत्तर पश्चिम मुंबईमध्ये दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व हे विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये मागच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांनी काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांचा पराभव केला होता. त्याआधी 2009 मध्ये इथून गुरुदास कामत हेच खासदार झाले होते. गुरुदास कामत यांचं 22 ऑगस्ट 2018 ला निधन झालं. आता या मतदारसंघाची मदार संजय निरुपम यांच्यावर आहे.

काँग्रेसमध्ये गटबाजी

अंधेरीसारख्या हिंदीभाषक मतदारांच्या उपनगरात संजय निरुपम यांना चांगला पाठिंबा मिळू शकतो पण काँग्रेसमधली अंतर्गत गटबाजी त्यांच्याविरोधात जाऊ शकते. या मतदारसंघात मराठी मतदारांचीही संख्या जास्त आहे. त्यामुळे शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांना त्याचा फायदा मिळू शकतो. त्यामुळेच गजानन कीर्तीकर आपला मतदारसंघ राखणार का याची चर्चा सुरू आहे. शिवसेनेची संघटनात्मक ताकद ही त्यांची जमेची बाजू मानली जाते.

मनसे फॅक्टर

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हाही मुंबईच्या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा बनला होता. राज ठाकरे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य करत भाजप सरकारवर जोरदार टीका करत होते. याचा फटका भाजपला किती बसेल हे निकालाअंती कळेल. त्यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीचा मतदानावर किती परिणाम होतो हाही प्रश्न आहे.

SPECIAL REPORT : निवडणूक आयोगाचा विरोधी पक्षांना मोठा झटका

First published: May 23, 2019, 8:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading