उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उर्मिला मातोंडकरांचा दारूण पराभव

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उर्मिला मातोंडकरांचा दारूण पराभव

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उर्मिला मातोंडकरांचा दारूण पराभव झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 23 मे : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांचा दारूण पराभव झाला आहे. भाजपचे गोपळ शेट्टी विरूद्ध काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर या लढतीकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं होतं. पण, गोपाळ शेट्टी यांनी उर्मिला मातोंडकरांचा 4 लाखाच्या मताधिक्यानं पराभव केला. ऊर्मिला मातोंडकर मराठी आणि हिंदी अशा दोन्ही मतदारांवर प्रभाव पाडू शकतात असा देखील एक तर्क होता.पण, मतदारांनी उर्मिला मातोंडकर यांना साफ नाकारलं. मतमोजणी दरम्यान उर्मिला मातोंडकर यांनी मतदान यंत्रात फेरफार झाल्याची तक्रार देखील निवडणूक आयोगाकडे केली होती. पराभवानंतर बोलताना उर्मिला मातोंडकर यांनी मतदारांचे आभार मानले.

एकतर्फी विजय

उर्मिला मातोंडकर मराठी आणि हिंदी अशा दोन्ही मतदारांवर प्रभाव पाडू शकतात असा कयास होता. शिवसेना - भाजप युतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांना इथल्या अमराठी, गुजराथी मतदारांचा चांगला पाठिंबा होता. त्याचा त्यांना फायदा झाला. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये गोपाळ शेट्टी चांगल्या मताधिक्याने निवडून आले होते.

राज ठाकरे फॅक्टर

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हाही उत्तर मुंबईच्या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा बनला होता. राज ठाकरे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य करत भाजप सरकारवर जोरदार टीका करत होते. याचा फटका भाजपला बसेल असा अंदाज होता. पण, निकालाअंती राज फॅक्टर देखील फोल ठरल्याचं दिसत आहे. त्यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीचा मतदानावर परिणाम होईल असा अंदाज होता. पण, प्रत्यक्षात मात्र स्थिती उलटी आहे.


VIDEO : शरद पवारांचा EVM मशीनवरून यू-टर्न, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 04:43 PM IST

ताज्या बातम्या