LIVE NOW

LIVE: भिवंडीमधल्या इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या गेली 26वर

राज्यातील आणि देशातील कोरोनासंबंधीच्या बातम्या आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स LIVE

Lokmat.news18.com | September 22, 2020, 11:49 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated September 22, 2020
auto-refresh

Highlights

8:01 pm (IST)

मराठा समाजासाठी अतिशय महत्वाची बातमी
मराठा समाजातील विद्यार्थी आणि तरुणांना दिलासा
'कोर्टाचा निकाल लागेपर्यंत सर्व योजना आहेत तशाच कायम'
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय
'शिक्षणाचा खर्च राज्य सरकार करणार'
'कोर्टाच्या निर्णयाला धक्का न लावता सर्व योजना सुरू'
'नोकरभरतीला आरक्षण लागू करण्याबाबत निर्णय नाही'
'मराठा आरक्षणावर सरकारची पुढील भूमिका जाहीर करणार'
अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी अर्ज दाखल -अशोक चव्हाण
अंतरिम स्थगिती हटवावी अशी विनंती केली -अशोक चव्हाण
'मेडिकल इंजिनीअरिंगच्या प्रवेशाचा खर्च 600 कोटी मंजूर'
'पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेसाठी 80 कोटींची तरतूद'
'सारथी संस्थेला 130 कोटी, मनुष्यबळ उपलब्ध करणार'
'अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 400 कोटी'
'मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना नोकरी'
कुटुंबातील एकाला एसटी महामंडळात नोकरी -अशोक चव्हाण
मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेणार -अशोक चव्हाण
आंदोलनातील गंभीर गुन्ह्यांबाबत चर्चा सुरू -अशोक चव्हाण

 

6:19 pm (IST)

खासदार संजय राऊत यांनी कंगना रणौतचं नाव न घेता निशाणा साधला आहे. ते म्हणाले,

एका अभिनेत्रीने उच्च न्यायालयात महापालिकेने अवैध बांधकामाबाबत केलेल्या कारवाईबाबत याचिका दाखल केली आहे. महापालिका ही स्वायत्त संस्था आहे. मात्र तरीही यात राज्यसभेच्या खासदाराला पक्षकार करण्यात यावं अशी मागणी केली आहे. बाबरी खटला असो किंवा  मराठी अस्मितेबाबतची केस असो, अशा अनेक खटल्यांना सामोरा गेलो आहे. तेव्हा अशा केसमुळे माझ्या शहराच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून मला कुणी थांबवू शकत नाही.'


Load More
राज्यातील आणि देशातील कोरोनासंबंधीच्या बातम्या आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स LIVE  
corona virus btn
corona virus btn
Loading