उत्तर पश्चिम मुंबईत भगवा फडकला; शिवसेनेचे गजानन कीर्तिकर विजयी

उत्तर पश्चिम मुंबईत भगवा फडकला; शिवसेनेचे गजानन कीर्तिकर विजयी

उत्तर पश्चिम मुंबईतून शिवसेनेच्या गजाजन कीर्तिकर यांनी संजय निरूपम यांचा पराभव केला आहे.

  • Share this:

मुंबई, 23 मे : उत्तर पश्चिम मुंबईतील लढत ही चुरशीची होईल असा राजकीय निरिक्षकांचा कयास होता. पण, सारे अंदाज खोटे ठरवत शिवसेनेचे गजाजन कीर्तिकर हे विजयी झाले आहेत. त्यांनी मुंबई काँग्रसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांचा पराभव केला आहे. उत्तर पश्चिम मुंबईमध्ये दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व हे विधानसभा मतदारसंघ येतात. 2014मध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या गजानन कीर्तिकर यांनी काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांचा पराभव केला होता. त्याआधी 2009 मध्ये  गुरुदास कामत हेच खासदार झाले होते. गुरुदास कामत यांचं 22 ऑगस्ट 2018 ला निधन झालं. त्यानंतर संजय निरूपम यांना काँग्रेसनं रिंगणात उतरवलं होतं. पण, जनतेनं मात्र निरूपम यांना नाकारलं.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उर्मिला मातोंडकरांचा दारूण पराभव

काँग्रेसमध्ये गटबाजी

अंधेरीसारख्या हिंदीभाषक मतदारांच्या उपनगरात संजय निरुपम यांना चांगला पाठिंबा मिळाला असता. पण, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी त्यांना भोवली असा एक अंदाज आहे. या मतदारसंघात मराठी मतदारांचीही संख्या जास्त होता. त्यामुळे शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांना त्याचा फायदा झाल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेची संघटनात्मक ताकद ही देखील त्यांची जमेची बाजू मानली जाते.

दक्षिण मध्य मुंबईचा गड शिवसेनेनं राखला; राहुल शेवाळे विजयी

मनसे फॅक्टर

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हाही मुंबईच्या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा बनला होता. राज ठाकरे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य करत भाजप सरकारवर जोरदार टीका करत होते.पण, निकालाअंती राज ठाकरे यांची जादू चालली नसल्याचं चित्र दिसलं. राज ठाकरेंच्या सभांना गर्दी तर झाली. पण, त्याचं मतांमध्ये मात्र रूपांतर झालं नाही.

VIDEO : 'राज्यात आम्ही लहान, पण 'हा' नेता उद्धव ठाकरेंचा मोठा भाऊ'

First Published: May 23, 2019 07:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading