लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून भासवला अपघात, मुंबईत तरुणाला अटक

लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून भासवला अपघात, मुंबईत तरुणाला अटक

रामसेन कुरिओ याने 19 ऑगस्टला लिव्ह-इन पार्टनर मरिना लालमानस्वामी हिला रक्तबंबाळ अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले. मरिना पाय घसरून पडली व तिला या अपघातात गंभीर दुखापत झाली, असे त्याने डॉक्टरांना सांगितले होते.

  • Share this:

मुंबई, 21 ऑगस्ट- 30 वर्षीय लिव्ह-इन पार्टनरची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी 20 वर्षीय तरूणाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. रामसेन कुरिओ (रा. कलिना परिसर, सांताक्रूझ, मूळ रा. मिझोरम) असे आरोपीचे नाव आहे. चारित्र्याच्या संशयामधून ही हत्या झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रामसेन कुरिओ याने 19 ऑगस्टला लिव्ह-इन पार्टनर मरिना लालमानस्वामी हिला रक्तबंबाळ अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले. मरिना पाय घसरून पडली व तिला या अपघातात गंभीर दुखापत झाली, असे त्याने डॉक्टरांना सांगितले होते. डॉक्टरांनी मरिनाला मृत घोषित केले. नंतर या संदर्भात वाकोला पोलीस स्टेशनला अपघाती मृत्यूचा अहवाल (एडीआर) नोंदवण्यात आला होता. मात्र, प्राथमिक वैद्यकीय तपासणीत असे दिसून आले की, या महिलेच्या डोक्यावर वजनदार वस्तूने वार झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तिच्या रामसेन कुरिओविरुद्ध लिव्ह-इन पार्टनरची हत्येचा गुन्हा दाखल नोंदविला.

हेअर-ड्रेसर होती मरिना..

रामसेन आणि मरिना लिव्ह-इन होते. मागील दोन वर्षांपासून ते सांताक्रूझच्या कलिना भागातील एका अपार्टमेंटमध्ये एकत्र राहत होते. मरिना ही हेअर-ड्रेसर म्हणून काम करत होती. आरोपी बेरोजगार होता. यावरून त्यांच्यात सतत भांडत होत होते. तो मरिनाच्या चारित्र्यावर कायम संशय घेत होता. यातून रामसेन याने मरिनाची हत्या केली असावी, असा पोलिसांचा संशय आहे.

कपडे काढून दाखवू का? पुण्यात दारूड्या महिलेची पोलिसांनाच शिवीगाळ पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 21, 2019 04:20 PM IST

ताज्या बातम्या