राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी फायनल, उर्मिला मातोंडकर, शरद पोंक्षेंचा पत्ता कट!

अखेर ही यादी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांकडे देणार आहे. राज्यपालांनी त्याला मान्यता द्यावी असे संकेत असले तरी त्यावर राज्यपाल आक्षेप घेऊ शकतात.

अखेर ही यादी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांकडे देणार आहे. राज्यपालांनी त्याला मान्यता द्यावी असे संकेत असले तरी त्यावर राज्यपाल आक्षेप घेऊ शकतात.

  • Share this:
    मुंबई, 2 नोव्हेंबर : गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या (Governor-appointed MLA) जागांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अखेर शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीकडून (NCP) उमेदवारांची नावं निश्चित झाली आहे. या यादीतून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (urmila matondkar)आणि शरद पोंक्षे (sharad ponkshe) यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.  आता ही यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) हे आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor bhagat singh koshyari)यांच्याकडे सादर करतात की, काही नावं राखीव ठेवतात याकडे लक्ष लागलं आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांची यादीत कुणाचे नाव वर्णी लागावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार बैठका सुरू होत्या. अखेर तीन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नावांना मान्यता देण्यात आली. यात 12 नावे असून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मिळून ही यादी तयार केली आहे. यात अनेक नवीन चेहरे असण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. पण, यात काही जणांना डच्चू देण्यात आला आहे. बाबा का ढाबाला अच्छे दिन देणाऱ्या 'त्या' युट्यूबरविरुद्द तक्रार, लाखोंचा घोटाळा काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू होती. पण, या शर्यतीतून अचानक त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा रंगली होती. पण, तशी शक्यताही नाकारण्यात आली. तर दुसरीकडे शिवसेनेकडून अभिनेते शरद पोंक्षे यांचे नाव पुढे आले  तर काँग्रेसमधून अभिनेत्री रेणुका शहाणे यांना संधी देण्याची मागणी करण्यात आली होती. पण, संभाव्य उमेदवारींची यादी आता पूर्ण झाली असून चर्चेतील नावांना वगळण्यात आले आहे. अखेर ही यादी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांकडे देणार आहे.  मुख्यमंत्र्यांनी राज्याचे महाधिवक्ता यांचा सल्ला घेऊन ही यादी तयार केली आहे. दिलासादायक बातमी, 'या' जिल्ह्यात दिवसभरात एकही कोरोनामुळे मृत्यू नाही! कला, साहित्य, संस्कृती, समाजसेवा, क्रीडा अशा क्षेत्रातल्या मान्यवरांची आमदार म्हणून नियुक्ती करण्याचे अधिकार राज्यपालांना आहेत. राज्यमंत्रिमंडळ या मान्यवरांची नावं निश्चित करतं आणि ती राज्यपालांकडे पाठवली जातात. राज्यपालांनी त्याला मान्यता द्यावी असे संकेत असले तरी त्यावर राज्यपाल आक्षेप घेऊ शकतात. त्यामुळे आता राज्यपाल कुठली भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संभाव्य उमेदवारी यादी राष्ट्रवादी   एकनाथ खडसे राजू शेट्टी यशपाल हिंगे / आदिती नलावडे आनंद शिंदे काँग्रेस मुजफ्फर हुसेन सचिन सावंत शिवसेना सचिन अहिर नितीन बानगुडे पाटील
    Published by:sachin Salve
    First published: