लिफ्ट दुरुस्तीचे सुरू होते काम, अचानक सुरू झाल्यामुळे कर्मचारी चिरडला

लिफ्ट दुरुस्तीचे सुरू होते काम, अचानक सुरू झाल्यामुळे कर्मचारी चिरडला

लिफ्ट दुर्घटनेमध्ये तीन जणांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली

  • Share this:

मनोज कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 06 फेब्रुवारी : मुंबईतील मुलुंड पूर्वेकडील रिचा टॉवरमध्ये लिफ्ट दुरस्तीचे काम सुरू होते. मात्र, अचानक लिफ्ट सुरू झाल्यामुळे एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

रिचा टॉवर या इमारतीत झालेल्या लिफ्ट दुर्घटनेमध्ये तीन जणांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली तर लिफ्टच्या वरच्या भागात अडकलेल्या संजय यादव या लिफ्ट टेक्निशियनचा लिफ्ट आणि भिंतीच्यामध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला.

आज सकाळी 11 वाजेच्या दरम्यान लिफ्टच्या दुरुस्तीसाठी इमारतीचे दोन रहिवासी आणि लिफ्टचा एक टेक्निशियन तेराव्या मजल्यावर असलेल्या या लिफ्टच्या दुरुस्तीचे काम करत होते. एक कर्मचारी हा लिफ्टच्या वरच्या भागात काम करत होता. त्यावेळी अचानक लिफ्ट सुरू झाली आणि वरील कर्मचारी हा लिफ्ट आणि भिंतीच्या पॅसेजमध्ये अडकला. त्यामुळे लिफ्ट आणि भिंतीत चिरडून या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभराच्या प्रयत्ना नंतर लिफ्टमध्ये अडकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढले तर लिफ्ट आणि भिंतीच्या मध्ये अडकलेल्या सुपरवायझरचा मृतदेह देखील बाहेर काढण्यात आला.

लिफ्टच्या दुरावस्थे संदर्भात वेळोवेळी स्थानिक नागरिकांनी विकासकाकडे तक्रार केली होती. परंतु, तरीदेखील विकासकाने याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता ही घटना घडल्याचं स्थानिकांचा आरोप आहे.

गॅस गिझर ठरतोय ‘गॅस बॉम्ब’, मुंबईनंतर पुण्यातही एकाचा मृत्यू

दरम्यान,  पुण्यात अंघोळ करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलंय.  अंघोळ करताना बाथरूमधील गॅस गिझरमधून गॅस गळती झाल्यानं तरुणाचा जीव गेलाय. पुण्यातील उचभ्रू अशा कोथरूड भागातल्या संगम सोसायटीतल्या घटनेनं एकच खळबळ उडाली.

आई-वडील बाहेरगावी गेल्यानं रामराजे सकपाळ हा 30 वर्षाचा तरुण घरात एकटाच होता. घरातून दुर्गंधी येत असल्यानं सोसायटीतील लोकांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी तात्काळ धाव घेत अग्नीशमन दलाच्या जवानांच्या मदतीनं दरवाजा तोडून घरात प्रवेश केला, तेव्हा रामराजे सकपाळ मृत अवस्थेत आढळले. शवविच्छेदनातून समोर आलेलं मृत्यूचं कारण ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. अंघोळ करताना गॅस गिझरमधून गॅस गळती झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

मुंबई पुण्यासारख्या शहरांबरोबर अगदी छोट्या शहरातही वीजेची बचत करण्यासाठी घरात गॅस गिझर लावण्याचं प्रमाण वाढलं आहे. पण, हाच गॅस गिझर घरातला बॉम्ब ठरतोय. गेल्या काही दिवसात गॅस गिझरमधून होणाऱ्या गॅस गळतीनं अनेकांना आपले जीव गमवावे लागलेत.

First published: February 6, 2020, 4:38 PM IST
Tags: liftmumbai

ताज्या बातम्या