मुंबई, 01 ऑक्टोबर: मुंबईतल्या (Mumbai City) भायखळ्यात (Byculla)एक लिफ्ट दुर्घटना घडली आहे. रविवारी एका इमारतीची लिफ्ट कोसळल्यानं 3 लहान मुलांसह 5 लोक जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना शनिवारी रात्री उशीरा जेजे मार्ग येथे एक ग्राऊंड प्लस 18 मजल्याच्या सीआरए इमारतीत घडली.
घटना घडल्यानंतर स्थानिक लोकांनी तात्काळ फायर ब्रिगेड (Fire Brigade) आणि पोलिसांनी (Police) याबाबतची माहिती दिली.
ही दुर्घटना दक्षिण मुंबईतल्या भायखळा भागात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यू कॅफे पॅराडाइज येथे असलेल्या खडिया स्ट्रीटजवळ गुलमोहर टेरेस इमारत आहे. शनिवारी रात्री 11.05 वाजता या इमारतीची सर्व्हिस लिफ्ट कोसळली. यावेळी लिफ्टमध्ये तीन महिला आणि दोन लहान मुलं होती.
हेही वाचा- Not Reachable अनिल देशमुख अखेर रिचेबल, ED कार्यालयात हजर
दुर्घटनेत जखमी झालेल्यांची नावं
हुमा खान - 24 वर्ष
आरशा खान- 07 वर्ष
सोहन कादरी - 03 वर्ष
नीलोफर रिजवान शेख- 36 वर्ष
शाहीन खान- 45 वर्ष
जखमींना उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पाचही जणांची प्रकृती स्थिर असून एकाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हेही वाचा- T20 World Cup: IPL स्टार राहुल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फेल, दोन्हीच्या आकडेवारीत मोठा फरक
वरळीतल्या घटनेची पुनरावृत्ती
जुलै महिन्यात वरळी येथील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील लिफ्ट कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला होता, तर एक जण जखमी झाला होता. हनुमान गलीतील बीडीडी चाळ जवळील एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत ही दुर्घटना घडली होती. या अपघातात एकूण 6 जण जखमी झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai