शेतकऱ्यांना 'कर्जमाफी' नको तर 'कर्जमुक्ती' हवी-आदित्य ठाकरे

शेतकऱ्यांना 'कर्जमाफी' नको तर 'कर्जमुक्ती' हवी-आदित्य ठाकरे

माफीही गुन्हेगाराला दिली जाते. शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायला तो काही गुन्हेगार नाही त्याला काही द्यायचं असेल तर कर्जमुक्ती देणं गरजेचं आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले.

  • Share this:

11 मार्च: शेतकऱ्यांना कर्जमाफी नको तर कर्जमुक्ती हवी आहे असं प्रतिपादन आज  युवासेनाप्रमुख आदित्या ठाकरे यांनी केलं आहे. ते विक्रोळीत शेतकरी मोर्च्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांशी बोलत होते.

माफीही गुन्हेगाराला दिली जाते. शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायला तो काही गुन्हेगार नाही त्याला काही द्यायचं असेल तर कर्जमुक्ती देणं गरजेचं आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले. आज शेतकऱ्यांसाठी सगळे पक्ष एकत्र येत आहेत पण मुळात कर्जमाफी मागायची वेळच शेतकऱ्यांवर का येते असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

नाशिकहून सहा दिवसांआधी निघालेला शेतकरी मोर्चा आज  मुंबईत पोहोचला.  सहा दिवस या मोर्चाकडे दुर्लक्ष करत असलेल्या राज्य सरकारला आज जाग आली आणि  जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली.   सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांबद्दल सकारात्मक असल्याचं म्हटलं. यानंतर शेतकरी नेते अजित नवले, अशोक ढवळे, जे.पी.गावित यांची महाजनांसोबत  विक्रोळी पोलीस ठाण्यात बैठक झाली.   कपिल पाटील आणि जयंत पाटीलदेखील या बैठकीला उपस्थित होते.

दरम्यान  विक्रोळी येथील गुरुद्वारा समितीतर्फे  शीख बांधवांनी शेतकऱ्यांच्या  मोर्च्यात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांसाठी थंड पाणी आणि पोहे यांची सोय केली आहे.  आम्ही देखील शेतकरी आहोत आणि मोर्चात सहभागी शेतक-यांची दुखं आम्ही समजू शकतो असं या शीख बांधवांनी यावेळी सांगितलं. तसंच  शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसंच शेतकऱ्यांना अच्छे दिन आले पाहिजेत नाहीतर २०१९ ला चित्र वेगळं दिसेल असंही हे शीख बांधव म्हणाले आहेत.

आता शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार पूर्ण करतं का  हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 11, 2018 05:35 PM IST

ताज्या बातम्या