News18 Lokmat

मुंबईतील 'नाईट लाईफ'साठी आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

'पोलिसांवर आधीच सुरक्षा व्यवस्था सांभाळण्याचा ताण आहे. त्यात पुन्हा रात्रभर दुकाने उघडी राहिल्यास त्यांचा ताण वाढेल.'

News18 Lokmat | Updated On: Dec 27, 2018 05:11 PM IST

मुंबईतील 'नाईट लाईफ'साठी आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई 27 डिसेंबर : नविन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत आनंदोत्सवाची रात्रभर परवानगी द्यावी अशी मागणी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. तशा आशयाचं एक पत्र आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. या आधीही आदित्य यांनी अशाच प्रकारची मागणी केली होती. मात्र सुरक्षेच्या कारणांमुळे गृहविभागाने अजुन त्यावर निर्णय घेतला नाही.


कायदेशीर मनोरंजनाची आणि आनंदोत्सव साजरा करण्याची परवानगी मिळावी. मुंबईतल्या अनिवासी भागातील सर्व ठिकाणे रात्रभर खुली ठेवण्याची विनंती युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केलीय. मुंबई आणि इतर शहरांत नाईट लाईफसाठीचा प्रस्ताव मुंबई महापालिका, मुंबई पोलिस आयुक्त यांनीही हिरवा कंदील दाखवलाय. तर गेल्याच वर्षी विधीमंडळातही हा प्रस्ताव मंजूर झालांय.Loading...


मात्र या सर्व मंजूर प्रस्तांवाना अजूनही गृह विभागाने मंजूरी दिलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लवकर निर्णय घ्यावा अशी विनंतीही आदित्य यांनी पत्रात केली आहे. तसेच जे दिवसा कायदेशीर आहे, ते रात्री बेकायदेशीर कसे असा सवालही आदित्य ठाकरे यांनी विचारलाय. त्यामुळे नाईट लाईफचा सकारात्मक विचार केल्यास रोजगार निर्मीतीत वाढ होईल असा दावाही आदत्य ठाकरे यांनी केलांय.


तर असा निर्णय घेतल्यास पोलिसांवर ताण येईल तसेच सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होईल असं मतही व्यक्त होतंय. पोलिसांवर आधीच सुरक्षा व्यवस्था सांभाळण्याचा ताण आहे. त्यात पुन्हा रात्रभर दुकाने उघडी राहिल्यास त्यांच्यावर ताण येईल त्यामुळे पुरेशी खबरदारी घेतल्याशीवाय असा कुठलाही निर्णय घेऊ नये असंही मत अनेक संघटनांनी व्यक्त केलं आहे.


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 27, 2018 05:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...