मुंबई, 28 मे: मुंबईतल्या गोरेगावमध्ये बिबट्याच (Leopard) दर्शन झालं आहे. आज सकाळी एका रहिवाशी इमारतीच्या आवारात हा बिबट्या दिसला. इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. सीसीटीव्हीत बिबट्या सोसायटीमध्ये शिरताना दिसतोय.
सकाळी पहाटे पहिल्यांदा दुधवाल्याला बिबट्याचं दर्शन झालं. बिबट्याला बघताच दुधवाला पळून गेला. आता इमारतीच्या आवारात बिबट्या दिसल्यानं रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
मुंबई: गोरेगावमध्ये बिबट्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण #Mumbai pic.twitter.com/j4Qi3Hnh4B
— News18Lokmat (@News18lokmat) May 28, 2021
गोरेगाव (Goregaon) मध्ये बिबट्या दिसल्याची ही पहिलीच घटना नाही आहे. याआधी बरेचदा गोरेगावमध्ये बिबट्याचा वावर दिसून आला आहे. मात्र या घटनांमुळे नागरिक भयभीत होत असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Leopard, Maharashtra, Mumbai, Wild animal