मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /बापरे! शिकारीच्या शोधात बिबट्याचा हाय सोसायटीत वावर; मुंबईतील धडकी भरवणारा VIRAL VIDEO

बापरे! शिकारीच्या शोधात बिबट्याचा हाय सोसायटीत वावर; मुंबईतील धडकी भरवणारा VIRAL VIDEO

शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास बिबट्यानं गोरेगाव पूर्व परिसरातील न्यु दिनदोशी गार्डन सोसायटीत प्रवेश केला होता.

शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास बिबट्यानं गोरेगाव पूर्व परिसरातील न्यु दिनदोशी गार्डन सोसायटीत प्रवेश केला होता.

Viral Video: मागील काही दिवसांपासून मुंबईतील (Mumbai) गोरेगाव पूर्व (Goregaon East) परिसरात बिबट्याचा वावर (Leopard roaming) वाढला आहे.

मुंबई, 14 ऑगस्ट: मागील काही दिवसांपासून मुंबईतील (Mumbai) गोरेगाव पूर्व (Goregaon East) परिसरात बिबट्याचा वावर (Leopard roaming) वाढला आहे. गोरेगाव पूर्व येथील एका हाय सोसायटीत रात्रीच्या सुमारास बिंदास्त फिरताना आढळला होता. बिबट्याचा संबंधित सोसायटीत फिरतानाचा व्हिडीओ (Viral Video) समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीच वातावरण पसरलं होतं. ही घटना ताजी असताना बिबट्यांनं पुन्हा एकदा त्याच सोसायटीत धडक मारली आहे. आपल्या सोसायटीत रात्री बिबट्याचा वावर असतो, ही बाब लक्षात आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

ही घटना मुंबईतील गोरेगाव पूर्व परिसरातील न्यु दिनदोशी गार्डन सोसायटीतील आहे. गेल्या एका महिन्यात दुसऱ्यांदा याठिकाणी बिबट्याचा वावर आढळला आहे. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास बिबट्यानं या सोसायटीत प्रवेश केला होता. शिकारीच्या शोधात हा बिबट्या सोसायटीत शिरला होता. सुदैवाची बाब म्हणजे, दरम्यान कोणीही पार्किंग परिसरात नव्हतं. त्यामुळे मोठी हिंसक घटना टळली आहे.

हेही वाचा-माणसाने घेतला बदला; मरेपर्यंत चावत राहिला, घरी येऊन पत्नीसमोर ठेवला मृत कोब्रा

तुम्ही व्हिडीओत पाहू शकता, हा बिबट्या सोसायटीत सर्व ठिकाणी फिरत आहेत. तसेच जिन्याच्या दरवाज्यातून वर जाण्याचाही प्रयत्न  करत आहे. पण जिन्याचा दरवाजा बंद असल्यानं त्याला वर जाता आलं नाही. ही सर्व घटना सोसायटीतील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाली आहे. या व्हिडीओ समोर आल्यानंतर परिसरातील नागरिकांना सतर्क करण्यात आलं आहे. संबंधित बिबट्या नेमका कोठून येतो, याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही.

First published:

Tags: Mumbai, Shocking video viral