• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • मुंबईच्या आरे कॉलनीत पुन्हा बिबट्याचा हल्ला; चिमुकल्याचे तोडले लचके

मुंबईच्या आरे कॉलनीत पुन्हा बिबट्याचा हल्ला; चिमुकल्याचे तोडले लचके

शुक्रवारी रात्री बिबट्याने एका 12 वर्षीय मुलावर हल्ला केला आहे. बिबट्यानं चिमुकल्याचे अक्षरश: लचके तोडले आहेत.

 • Share this:
  मुंबई, 09 ऑक्टोबर: मुंबईतील गोरेगाव पूर्वेतील आरे कॉलनीत गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत वाढताना दिसत आहे. गेल्या दीड महिन्यांत येथील रहिवासी असणाऱ्या व्यक्तींवर आणि लहान मुलांवर बिबट्यानं तब्बल सात वेळा हल्ला (leopard attack in aarey colony 7 times) केला आहे. काही दिवसांपूर्वी येथील एका आठ वर्षीय मुलावर बिबट्यानं हल्ला केला होता. पण मुलाच्या वडिलांनी प्रसंगावधान दाखवत मुलाची बिबट्याच्या जबड्यातून सुटका केली होती. ही घटना ताजी असताना आता पुन्हा बिबट्याने आरे कॉलनीतील एका 12 वर्षीय मुलावर हल्ला केला आहे. शुक्रवारी रात्री बिबट्याने एका 12 वर्षीय मुलावर हल्ला केला आहे. बिबट्यानं चिमुकल्याचे अक्षरश: लचके तोडले आहेत. जखमी अवस्थेत विव्हळत पडलेल्या मुलाला परिसरातील रहिवाशांनी ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे. मुलाच्या शरीरावर अनेक ठिकाणी बिबट्याने लचके तोडल्याने जखमा झाल्या आहेत. गेल्या दीड महिन्यात बिबट्या सातव्यांदा हा हल्ला केल्यानं परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. बिबट्याच्या सततच्या हल्ल्यामुळे येथील नागरिक दिवसाही घराबाहेर पडायला घाबरत आहेत. हेही वाचा-धक्कादायक! इगतपुरी-कसारा स्थानकांदरम्यान धावत्या रेल्वेत तरुणीवर अत्याचार काल रात्री बिबट्याने आरे कॉलनीत युनिट क्रमांक 13 मध्ये राहणाऱ्या मुलावर हा जीवघेणा हल्ला केला आहे. ही दक्षिणात्य नागरिकांची लोकवस्ती असून वस्तीला लागूनच डोंगराळ भाग आहे. याठिकाणी किमान 6 ते 7 बिबटे असावेत, असा अंदाज स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरा लावून एका बिबट्याला जेरबंद केलं होतं. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी देखील एका बछड्याला पकडून वन खात्याच्या हवाली केलं होतं. हेही वाचा- VIDEO: धाडस दाखवत वडिलांनी बिबट्याच्या जबड्यातून चिमुकल्याची केली सुटका, मुंबईतील थरारक घटना असं असून आरे कॉलनीत पुन्हा पुन्हा बिबट्या नागरिकांवर हल्ला करत आहेत. येथील काही कुत्र्यांवर देखील बिबट्याने हल्ला केला होता. मानवी वस्तीत बिबट्याचा सततच्या शिरकावामुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं असून संबंधित बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: