Home /News /mumbai /

मुंबई HC च्या न्यायाधीशांबाबत वकीलाची जीभ घसरली; मायक्रोफोन सुरू राहिल्यानं झाला घोळ

मुंबई HC च्या न्यायाधीशांबाबत वकीलाची जीभ घसरली; मायक्रोफोन सुरू राहिल्यानं झाला घोळ

Mumbai High Court News: व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी (Video Conferencing Hearing) सुरू असताना एका वकिलानं न्यायाधिशांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी (Offensive Comment) केल्याची घटना समोर आली आहे.

    मुंबई, 27 जुलै: मुंबई उच्च न्यायालयाचे (Mumbai High court) न्यायाधीश सारंग कोतवाल (Justice Sarang Kotwal) यांनी सोमवारी एका सुनावणी (Hearing) दरम्यान एका वकिलाची चांगलीच खरडपट्टी केली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी (Video Conferencing Hearing) सुरू असताना एका वकिलानं न्यायाधिशांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी (Offensive Comment) केली होती. संबंधित वकिलाचा मायक्रोफोन सुरू राहिल्यानं हा आवाज न्यायालयातील सर्व उपस्थितीतांना ऐकू गेला होता. त्यामुळे न्यायाधिश कोतवाल यांनी संबंधित वकिलाची चांगलीच कानउघडणी केली आहे. विशेष म्हणजे वकिलानं माफी मागूनही न्यायाधीशांनी त्याची माफी स्विकार केली नाही. आपला मायक्रोफोन सुरू आहे, याची जाणीव नसल्यानं संबंधित वकिलानं मराठी भाषेत 'बघा कोतवालच्या कोर्टात किती गर्दी आहे' अशी टिप्पणी केली होती. संबंधित वकिलाचा बोलण्याचा रोख ओळखून न्यायाधीश सारंग कोतवाल त्याच्यावर प्रचंड चिडले. न्यायाधीश कोतवाल यांनी आपल्या सहकार्याला संबंधित वकील कोण आहे? याचा तपास करायला सांगितलं. पण तोपर्यंत संबंधित वकिलानं लॉग आऊट केलं होतं. पण न्यायाधीश कोतवाल यांनी पुन्हा लॉग इन करायला लावून वकिलाला झापलं आहे. हेही वाचा-पुरग्रस्तांना राष्ट्रवादीचे मंत्री, खासदार, आमदार एक महिन्याचे देणार वेतन यावेळी वकिलानं आपल्या चुकीसाठी माफी देखील मागितली मात्र न्यायाधीशांनी त्याला माफ केलं नाही. यावेळी कोर्ट रुममध्ये काही सरकारी वकिलांसह पोलीस कर्मचारी आणि काही अन्य लोकंही उपस्थित होते. यावेळी न्यायाधीश म्हणाले की, 'कोर्टात कोणी हजर राहावं आणि मी कोर्टात कोणाला परवानगी द्यायची हा माझा विशेषाधिकार आहे. कायद्याच्या ज्ञानासोबत थोडं आचरण, शिष्टाचार, कोर्टाला संबोधित कसं करायचं, या गोष्टी शिकण्याची तुम्हाला गरज आहे,' अशा कठोर शब्दांत न्यायाधीशांनी वकिलाची कानउघडणी केली आहे. हेही वाचा-राज ठाकरेंचा मलाही फोन आला होता, सुधीर मुनगंटीवारांचा मोठा खुलासा न्यायाधीशांनी फटकार लगावल्यानंतर, वकिलानं पुन्हा एकदा माफी मागितली. पण न्यायाधीशांनी त्याच्या माफीचा स्विकार न करता, त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू असलेल्या सुनावणीतून हटवलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: High Court, Mumbai

    पुढील बातम्या