Home /News /mumbai /

महिलांसाठी विशेष रेल्वे सेवा सुरू करा, राज्यातील कॅबिनेट मंत्र्याने केली मागणी

महिलांसाठी विशेष रेल्वे सेवा सुरू करा, राज्यातील कॅबिनेट मंत्र्याने केली मागणी

राज्य सरकारने महिलांना प्रवास करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर रेल्वेने नियमित सेवा सुरू केली नाही.

  मुंबई, 19 ऑक्टोबर : मुंबईकरांचा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने लवकरात लवकर रेल्वे सेवा सुरू करावी आणि महिलांसाठी विशेष सेवा सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री व मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. राज्य सरकारने महिलांना प्रवास करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर रेल्वेने नियमित सेवा सुरू केली नाही. ज्यामुळे महिला प्रवाशांना सुविधा मिळत नाही. एकीकडे रेल्वेमंत्री पियुष गोयल हे रेल्वे सेवा सुरू करण्यास तयार आहेत. मात्र राज्यसरकारने परवानगी दिली नाही सांगत आहेत. परंतु राज्य सरकारने आता परवानगी देवून सेवा का दिली जात नाही असा सवाल करतानाच केंद्र सरकार यामध्ये राजकारण करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. 'रेल्वेची नियमित सेवा सुरू करा, जादा गाड्या सुरू करा, गर्दी होऊ नये यासाठी अतिरिक्त सेवा सुरू करा,' अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे. मुंबई लोकल आणि राजकीय आरोप प्रत्यारोप राज्य सरकारने मुंबई लोकलमधून महिलांना प्रवास करण्याची मुभा देण्याची विनंती पत्राद्वारे रेल्वे विभागाला केली. सरकारनेच लोकल प्रवासाला हिरवा कंदील दाखवल्याने लवकरच याबाबतचा निर्णय होईल, अशी आशा मुंबई आणि परिसरातील महिलांमध्ये निर्माण झाली. मात्र रेल्वे बोर्डाने याबाबतचा निर्णय न घेतल्याने महिलांचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला. याच मुद्द्यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी महिलांच्या लोकल प्रवासावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. 'मंदिरे उघडा म्हणून बोंब ठोकणाऱ्या भाजपाला मायभगिनींकरिता लोकल सुरू व्हावी व नवरात्रीत त्यांची सोय होईल याची तमा नाही. भाजपाचा आवाज बंद का? घंटानाद का नाही? राज्य सरकारने रेल्वेला महिलांना प्रवासाची मुभा द्या असे कळवले आहे. CPM रेल्वे बोर्डाची परवानगी लागेल अशी कारणं देत आहेत,' असा घणाघात सचिन सावंत यांनी केला आहे.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Akshay Shitole
  First published:

  Tags: Mumbai local

  पुढील बातम्या