• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • Weather Forecast: महाराष्ट्रात पावसाचं कडकडीत लॉकडाऊन; जाणून घ्या कसं असेल हवामान

Weather Forecast: महाराष्ट्रात पावसाचं कडकडीत लॉकडाऊन; जाणून घ्या कसं असेल हवामान

गेल्या चार-पाच दिवसांपासून बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र सध्या सौम्य झालं आहे.

 • Share this:
  मुंबई, 18 ऑक्टोबर: गेल्या चार-पाच दिवसांपासून बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र सध्या सौम्य झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा (Rain in Maharashtra) जोर कमी झाला आहे. गेल्या तीन दिवसात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. याचा सर्वाधिक फटका उत्तरेकडील जिल्ह्यांना बसला आहे. नाशिक आणि अकोला जिल्ह्यात कोसळलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाला आलेला घास अस्मानी संकटाने हिरावून नेला आहे. असं असलं तर आता महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील पाच दिवस राज्यात पावसाचं कडकडीत लॉकडाऊन राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील उर्वरित काम करता येणार आहेत. पुढील पाचही दिवस राज्यात हवामान खात्याने कोणताही इशारा दिला नाही. सर्वत्र कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका पावसाच्या सरी कोसळू शकतात. हेही वाचा-कल्याणच्या कारागृहात पुन्हा कोरोनाचा शिरकाव; 20 कैदी आढळले संक्रमित सध्या बहुतांशी राज्यांतून मान्सून परतला असला तरी, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तर भारत आणि ईशान्यकडील राज्यांत अद्याप मान्सूनचा पाऊस कोसळत आहे. आज उत्तर प्रदेशासह, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेशातील काही जिल्हे आणि ईशान्यकडील सर्व राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हेही वाचा-262 दिवसांनंतर हा देश घेणार मोकळा श्वास; 9 महिन्यांपासून होतं Lockdown दुसरीकडे, केरळात मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने थैमान घातलं आहे. ढगफुटी सदृश्य पावसामुळे केरळातील जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक नद्यांना पूर आला आहे. पुरस्थितीचे अंगावर काटा आणणारे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहेत. लोकांची मोठी घरं देखील पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: