आत्मघातकी स्फोटाचं प्रशिक्षण घेतलेल्या दहशतवाद्याला अटक, एटीएसची मोठी कारवाई

दहशतवादी विरोधी पथकानं मुंबईतून फैजल मिर्झा नावाच्या संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतलं आहे. मुंबई पुन्हा दाऊदच्या निशाण्यावर तर नाही ना? असा संशय आता व्यक्त केला जातोय.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 13, 2018 09:34 PM IST

आत्मघातकी स्फोटाचं प्रशिक्षण घेतलेल्या दहशतवाद्याला अटक, एटीएसची मोठी कारवाई

13 मे : दहशतवाद्यांना पुन्हा एकदा मुंबईकडे वक्रदृष्टी वळवली आहे. दहशतवादी विरोधी पथकानं मुंबईतून फैजल मिर्झा नावाच्या संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतलं आहे. मुंबई पुन्हा दाऊदच्या निशाण्यावर तर नाही ना? असा संशय आता व्यक्त केला जातोय. आणि त्यामागचं नेमकं कारण म्हणजे दहशतवादी विरोधी पथकानं अटक केलेला संशयित दहशतवादी.

चौकशीदरम्यान संशयितानं धक्कादायक खुलासे केल्याचं सुत्रांकडून सांगण्यात येतंय. तपासयंत्रणांच्या हाती लागलेल्या संशयितानं आत्मघातकी स्फोट घडवून आणल्याचं ट्रेनिंग घेतलंय. तो पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय तसंच दाऊदच्या डी कंपनीच्या संपर्कात होता अशी देखील माहिती समोर येतेय.

एवढंच नव्हे तर डी कंपनीनं पुरवलेल्या पैश्याच्या जोरावर तो शारजा, दुबई आणि पाकिस्तानात जाऊन आला अशी देखील माहिती समोर येतेय. दरम्यान अटक केलेल्या संशयिताला न्यायालयासमोर हजर केलं असता त्याला 21 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 13, 2018 09:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...