पेट्रोल-डिझेलचे दर वाढता वाढे,मुंबईत पेट्रोलचे दर ८८ गाठणार!

पेट्रोल-डिझेलचे दर वाढता वाढे,मुंबईत पेट्रोलचे दर ८८ गाठणार!

आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झालीये. मुंबईत पेट्रोल १२ पैसे तर डिझेल २९ पैशांनी महागले आहे.

  • Share this:

मुंबई, 12 आॅक्टोबर : केंद्र सरकाराने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करून सर्वसामान्यांच्या जखमेवर मलमपट्टी केली खरी पण इंधनाच्या वाढत्या किंमतीवर अजूनही लगाम बसलेला नाही. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झालीये. मुंबईत पेट्रोल १२ पैसे तर डिझेल २९ पैशांनी महागले आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालीये. मुंबईत डिझेलच्या दरात मोठी वाढ झालीये. डिझेलच्या दरात २९ पैशांची वाढ होऊन दर ७८.५१ रुपयांवर पोहोचलाय. तसंच पेट्रोल 12 पैशांनी महागले असून दर 87.94 रुपयांवर पोहोचले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

राजधानी दिल्लीतही पेट्रोलच्या दरात १२ पैशांनी वाढ झाली असून दर ८२.४८ रुपयांवर पोहोचले आहे. तर डिझेल २८ पैशांनी महागले असून दर ७४.९० पैशांवर पोहोचले आहे.

गुरुवारी इतके होते दर

शुक्रवारच्या तुलनेत काल गुरुवारी दिल्लीत पेट्रोलचे दर ८२.३६ रुपये प्रतिलिटर होते. तर डिझेलचे दर ७४.६२ रुपये दर होता. तर मुंबईत पेट्रोलच्या दरात ९ पैशांनी वाढ होऊन दर 87.82 रुपये प्रति लीटर वर पोहोचले. तर डिझेलचे दर 78.22 रुपए प्रति लिटर होते.

================================

First published: October 12, 2018, 10:06 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading