Home /News /mumbai /

Petrol-Dieselच्या किंमतीत मोठी घसरण, गेल्या 6 महिन्यात सर्वात स्वस्त झालं पेट्रोल

Petrol-Dieselच्या किंमतीत मोठी घसरण, गेल्या 6 महिन्यात सर्वात स्वस्त झालं पेट्रोल

दरांमध्ये घसरण झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. तर मंदीच्या तडाख्यात्या अर्थव्यवस्थाही तडाख्यातून काहीसा दिलासा मिळणार आहे.

    मुंबई 02 मार्च : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती घसरल्याने त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातही झाला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती घसरल्या असून किंमती गेल्या 6 महिन्यातल्या निच्चांकी स्तरावर आल्या आहेत. पेट्रोल आज पेट्रोल 22-23 पैसे प्रति लीटर स्वस्त झालं आहे. तर डिझेलचे दरही 20-21 पैसे प्रति लीटर घसरून 64.10 रुपयांवर आले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये कच्चा तेलाच्या दरात आंतरराष्ट्रीय बाजारात उसळी आल्याने पेट्रोल आण डिझेलच्या किंमती वाढल्या होत्या. कच्च्या तेलाच्या दरात 1 डॉलरचीही वाढ झाल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा काही हजार कोटींचा फटका बसत असतो. अमेरिका आणि इराणमध्ये तणाव निर्माण झाल्याने त्याचा फटका सगळ्याच देशांना बसला होता. त्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्याने अर्थव्यवस्थेवर ताणही येत होता. आधीच सगळं जग मंदीच्या सावटाखाली आहे. त्यात ही भर पडल्याने अनेक देशांना त्याचा जबर फटका बसला होता. भारताची तेलाची 80 टक्के गरज ही आयातीवरच भागवली जाते. त्यासाठी कोट्यवधी परदेशी चलन खर्ची पडत असतं. त्याचा अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होतो. पेट्रोल-डिझेल महागलं की वाहतूक महाग होते आणि त्याचा परिणाम जिवनावश्यक वस्तूंवर होऊन महागाईचा भडका उडतो. दरांमध्ये घसरण झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. दिल्लीत एक लीटर पेट्रोलची किंमत 71.49 रुपये तर डीझल 64.10 रुपये झाली आहे. मुंबईत एक लीटर पेट्रोल चा दर 77.18 रुपये तर डिझेल 67.13 रुपये प्रति लीटर झालं आहे. कोलकात्यात पेट्रोल 74.16 रुपये तर डिझेल 66.43 रुपये प्रति लीटर, चेन्नईत पेट्रोल 74.28 रुपये तर डिझेल 67.65 रुपये प्रति लीटर असे दर आहेत.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Petrol and diesel

    पुढील बातम्या