Petrol Diesel Price : सलग दुसऱ्या मुंबईकरांना दिलासा, हे आहेत पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) दरांमध्ये बुधवारी (14 ऑगस्ट) कोणतेही बदल झाले नाहीत. सलग तीन दिवसांत पेट्रोलचे दर जैसे थेच असून डिझेलच्या किंमती दोन दिवसांपासून स्थिर आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 14, 2019 09:39 AM IST

Petrol Diesel Price : सलग दुसऱ्या मुंबईकरांना दिलासा, हे आहेत पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

मुंबई, 14 ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याचे परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरही पाहायला मिळत आहेत.  पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) दरांमध्ये बुधवारी (14 ऑगस्ट) कोणतेही बदल झाले नाहीत. सलग तीन दिवसांत पेट्रोलचे दर जैसे थेच असून डिझेलच्या किंमती दोन दिवसांपासून स्थिर आहेत. ग्राहकांसाठी हे दिलासादायक वृत्त आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचे प्रति लिटर दर 77.62 रुपये तर डिझेलचे प्रति लिटर दर 68.57 रुपये आहेत. तर राजधानी नवी दिल्लीत पेट्रोलचे प्रति लिटर 71.99 रुपये तर डिझेलचे प्रति लिटर दर 65.44 रुपये इतके आहेत.

(वाचा :मनी प्लान्ट नाही तर हे रोप घरी लावा आणि व्हा श्रीमंत)

सकाळी 6 वाजता किंमतींमध्ये होतो बदल

पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये प्रत्येक दिवशी वाढ तसंच घट पाहायला मिळते. सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी ( HPCL, BPCL, IOC ) रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर (excise duty), डीलर कमीशन या सर्व बाबी मिळून इंधनाच्या दरामध्ये वाढ होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात.

(वाचा :विकृतीचा कळस! गर्भवती तरुणीवर सामूहिक बलात्कार, 12 तासांत 11 वेळा केले अत्याचार)

Loading...

आपल्या शहरातील इंधनाचे दर असे तपासा

विशेष नोंदणीकृत क्रमांकावर SMS पाठवून तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाच्या दरांबाबत माहिती मिळवता येईल. पण ही सुविधा आपल्या फोनवरून उपलब्ध व्हावी, यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी तुम्हाला कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. SMS सुविधा मिळवण्यासाठी कोड असणं आवश्यक आहे.

(वाचा :या तीन राशींच्या मुली होऊ शकतात सर्वात चांगल्या पत्नी!)

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा

इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड> 92249 9 2249

बीपीसीएल ग्राहक  RSP<डीलर कोड> 9223112222

एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड> 9222201122

या क्रमांकावर सुविधा पाठवून तुम्हाला इंधनाचे दर स्मार्टफोनवरच मिळवता येतील.

पेट्रोल जीएसटीच्या कक्षेत आलं तर काय होईल ?

पेट्रोलची जेवढी किंमत असते तेवढाच कर त्यावर भरावा लागतो. कच्चं तेल खरेदी केल्यानंतर ते रिफायनरीमध्ये नेलं जातं आणि नंतर शुद्ध झालेलं पेट्रोल मिळतं. अशा पेट्रोल आणि डिझेलवर कर द्यावा लागतो. सगळ्यात पहिल्यांदा सरकार अबकारी कर लावतं. त्यानंतर त्या त्या राज्यांतही कर लावला जातो. त्याला सेल्स टॅक्स किंवा व्हॅट म्हटलं जातं. पेट्रोल-डीझेलला जीएसटीच्या कक्षेत आणलं तर ते सामान्य माणसाच्या हिताचं ठरेल पण यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचं नुकसान होऊ शकतं.

VIDEO: 'माझ्या धन्या, मी दम सोडला पण...' मनाला चटका लावणारी कविता!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 14, 2019 09:17 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...