पेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर!

पेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर!

सरकारनं इंधन दरात 5 रुपयांची कपात केल्यानंतर पेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं सरकताहेत, तर डिझेलचे दर 80 रुपयांच्या उंबरठ्यावर येऊन पोहचलेत.

  • Share this:

मुंबई, 14 ऑक्टोबर : पेट्रोलच्या दरानं नव्वदी तर डिझेलच्या दरानं ऐंशीचा पल्ला ओलांडल्यानंतर, सरकारनं इंधन दरात 5 रुपयांची कपात केली. इंधनातल्या दरकपातीनंतर केंद्राच्या तिजोरीवर 21 हजार कोटींचा भारही वाढला. मात्र, ऐवढा खटाटोप करूनही सर्वसामान्यांना दिलासा मिळतच नसल्याचं दिसतंय. कारण पेट्रोलचे दर पुन्हा एकदा नव्वदीच्या दिशेनं सरकताहेत तर डिझेलचे दर 80 रुपयांच्या उंबरठ्यावर येऊन पोहचलेत.

प्रति लिटर 6 पैशांची वाढ झाल्यानं मुंबईत आजचा पेट्रोलचा दर 88 रुपये 27 पैसे इतका आहे, तर डिझेलच्या दरात प्रति लिटर 20 पैशांची वाढ झाल्यानं मुंबईतला आजचा डिझेलचा दर 79 रुपये 12 पैसे इतका आहे. केंद्रानं इंधनावरच्या करात कपात केल्यानंतरही ही दरवाढ का सुरू आहे? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलाय.

पेट्रोलचे दर...

कर कपाती आधीचे दर : 91.39 रुपये

5 रुपयांच्या कपातीनंतरचे दर : 86.39 रुपये

आजचे दर : 88.27 रुपये

डिझेल दर...

कर कपाती आधीचे दर : 80.15 रुपये

5 रुपयांच्या कपातीनंतरचे दर : 75.15 रुपये

आजचे दर : 79.12 रुपये

 धक्कादायक VIDEO, रामलीलात तोंडातून आग काढताना कलाकार जळाला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2018 07:37 PM IST

ताज्या बातम्या