LIVE: इक्बाल मिर्ची प्रकरणी प्रफुल पटेल यांना पुन्हा जारी होणार समन्स, ED कडून होणार चौकशी

प्रफुल्ल पटेल यांना ईडीकडून पुन्हा एकदा समन्स जारी होणार आहे. या आधी 18 ऑक्टोंबर 2019 रोजी प्रफुल पटेल चौकशी करता इडी कार्यालयात हजर राहिले होते

 • News18 Lokmat
 • | February 12, 2021, 12:57 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  20:18 (IST)

  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना मंत्र्यावर आरोप, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप, पोलिसांनी स्यू-मोटोअंतर्गत तक्रार दाखल करावी, मंत्री संजय राठोडांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची मागणी

  19:52 (IST)

  राणीची बाग मुंबईकरांसाठी 15 फेब्रुवारीपासून पाहता येणार

  19:45 (IST)

  वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय 15 फेब्रुवारी 2021 पासून होणार खुलं, कोविड-19 विषयी सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं अनिवार्य, विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, 5 वर्षांखालील मुलांनी शक्यतो भेट देणं टाळावं

  19:43 (IST)

  अहिल्याबाई होळकर पुतळा अनावरणावरून वाद
  उद्या जेजुरी गडावर पुतळ्याचं होणार अनावरण
  शरद पवारांच्या हस्ते उद्या पुतळ्याचं अनावरण
  अहिल्याबाई होळकरांच्या वंशजांचा विरोध
  भूषणसिंहराजेंचं संभाजीराजे छत्रपतींना पत्र
  संभाजीराजेंना उपस्थित न राहण्याचं केलं आवाहन

  19:39 (IST)

  'राज्यातील एकही प्रॉपर्टी केंद्राला विकू देणार नाही'
  याविरोधात काँग्रेस आंदोलन करणार -नाना पटोले
  कोकण रेल्वे विकण्याचा घाट -नाना पटोले
  याविरोधातही काँग्रेसची लवकरच मोहीम -पटोले
  'मोदींचा चार्ज काढण्यासाठी मला इथं चार्ज दिला'
  'राज्यात काँग्रेस पक्षाला नंबर वन बनवणार'
  राहुल, सोनिया गांधींना मी शब्द दिला -पटोले

  19:10 (IST)

  नाना पटोलेंच्या डोक्यात काँग्रेसला एक नंबर पक्ष बनवायची सणक बसली आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, 
  एकत्र पद्धतीनं महाराष्ट्र आणि देशात पक्ष एक नंबर करायचा, यात झोकून देऊन काम करू -बाळासाहेब थोरात

  18:58 (IST)

  पक्षाला मजबूत करणं गरजेचं -एच.के. पाटील
  'सगळ्यांना एकत्र घेऊन काम करा'
  देशात राजकीय परिस्थिती नाजूक -पाटील
  मोदी सरकार शेतकरीविरोधी -एच.के. पाटील
  'देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम'
  'कृषी कायद्याविरोधात केलं आंदोलन'
  राष्ट्रपतींना पत्र दिलं -एच.के. पाटील
  'आघाडी सरकारनं कृषी कायदे लागू करू नये'
  'कृषी कायदे फेटाळून लावण्यासाठी पावलं उचला'
  महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील आक्रमक

  18:58 (IST)

  पक्षाला मजबूत करणं गरजेचं -एच.के. पाटील
  'सगळ्यांना एकत्र घेऊन काम करा'
  देशात राजकीय परिस्थिती नाजूक -पाटील
  मोदी सरकार शेतकरीविरोधी -एच.के. पाटील
  'देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम'
  'कृषी कायद्याविरोधात केलं आंदोलन'
  राष्ट्रपतींना पत्र दिलं -एच.के. पाटील
  'आघाडी सरकारनं कृषी कायदे लागू करू नये'
  'कृषी कायदे फेटाळून लावण्यासाठी पावलं उचला'
  महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील आक्रमक

  18:41 (IST)

  अमरावती महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं दहावी-बारावीचे वर्ग वगळून सर्व शाळा 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा महापौर चेतन गावंडे यांचा निर्णय

  18:32 (IST)

  काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे -अशोक चव्हाण
  'काँग्रेसची ध्येयधोरणं घेऊनच हे सरकार चालेल'
  आघाडीतील इतर मित्रपक्षांना सूचक इशारा

  प्रफुल्ल पटेल यांना ईडीकडून पुन्हा एकदा समन्स जारी होणार आहे. या आधी 18 ऑक्टोंबर 2019 रोजी प्रफुल पटेल चौकशी करता इडी कार्यालयात हजर राहिले होते