शेअर बाजार वधारला तर सोन्याच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या नवे दर

शेअर बाजार वधारला तर सोन्याच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या नवे दर

मंदीच्या वातावरणात शेअर बाजार वधारल्यानं गुंतवणूकदारांना तर सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला.

  • Share this:

नवी दिल्ली 15 नोव्हेंबर :  आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किंमतीत घसरण झाली तर शेअर बाजार वधारलेला होता. सोनं घसरल्याने झाल्याने त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेवरही झालाय. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासूनचे सोन्याच्या भावात चढउतार होत आहेत. चीन आणि अमेरिकेचं ट्रेड वॉर, हाँगकाँगमध्ये असलेली अस्वस्थता यामुळे गुंतवणूकदारांचा कल हा सोन्याकडे असल्याने फक्त सोन्याच्याच नाही तर चांदीच्याही भावांमध्ये चढ उतार होताहेत. जगात भारत हा सोन्याचा सर्वाधिक वापर करणारा देश असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या चढ उताराचा भारतातल्या मार्केटवर लगेच परिणाम होत असतो. आज सोन्याच्या किंमतीत 149 रुपयांची घसरण झाली. तर चांदी किलोमागे तब्बल 473 रुपयांनी स्वस्त झाली. शुक्रवार दिल्लीत 10 ग्राम सोन्याच्या किंमती 39024 रुपयांवरून 39024 रुपये झाल्यात.

गुरुवारी असे होते सोन्याचे दर

दिल्लीत 10 ग्राम सोन्याची किंमत 38,980 रुपयांनी वाढून ती  38,995 रुपयांवर गेलीय. 10 ग्रामसाठी बुधवारी दिल्लीत सराफा बाजारात सोन्याची किंमत 225 रुपयांनी वाढून 38,715 रुपयेजाली होती.  तर मंगळवारी सोनं 38,490 रुपयांवर स्थिर होतं.

आढवड्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शेअर बाजारात थोडी उसळी बघायला मिळाली. मुंबई शेअर बाजार जेव्हा बंद झाला तेव्हा तो 0.17 टक्क्यांनी वाढून 40,356.69 वर बंद झाला तर  निफ्टी 23.20 अंकावर म्हणजेच  0.20 टक्क्यांनी वाढून 11,895.30 वर बंद झाला. ही वाढ छोटी असली तरी गुंतवणूकदारांसाठी मंदीच्या वातावरणात दिलासा देणारी होती.

कसं ओळखायचं अस्सल सोनं?

दातांची टेस्ट - तुम्ही दातांमध्ये सोनं दाबून ठेवलंत तर ते खरं असेल तर दातांवर निशाणी दिसेल. सोन्याचे दागिनेही 24 कॅरेटचे तयार करत नाहीत. त्यात इतर धातू मिसळावे लागतात.

पाण्याची टेस्ट - आणखी एक सोपी पद्धत म्हणजे पाण्याची टेस्ट. त्यासाठी एका खोल भांड्यात 2 ग्लास पाणी टाका आणि त्यात सोन्याचे दागिने बुडवा. सोनं तरंगलं तर ते खरं नाही. ते खाली गेलं तर खरं आहे, समजावं.

सिरॅमिक थाळी - बाजारातून पांढऱ्या रंगाची ही थाळी आणा. सोनं त्या थाळीवर घासा. थाळी काळी पडली तर समजा सोनं खोटं आहे आणि चांगले रंग थाळीवर चढले तर ते सोनं असली आहे.

चुंबक टेस्ट - तज्ज्ञांच्या मते दुकानातून चुंबक घ्या आणि सोन्याच्या दागिन्यांवर लावा. सोनं त्यावर चिकटलं तर ते असली नाही. चिकटलं नाही तर ते अस्सल सोनं आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2019 06:24 PM IST

ताज्या बातम्या