राहुल गांधी यांचे मुंबई विमानतळावर आगमन, भिवंडी न्यायालयात राहणार हजर

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज भिवंडी न्यायालयात हजर राहणार आहेत. त्यासाठी ते आज मुंबईत असणार आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Jun 12, 2018 09:00 AM IST

राहुल गांधी यांचे मुंबई विमानतळावर आगमन, भिवंडी न्यायालयात राहणार हजर

मुंबई, 12 जून : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज भिवंडी न्यायालयात हजर राहणार आहेत. त्यासाठी ते आजा मुंबईत असणार आहे. काही वेळांआधीच त्याचं मुंबई विमानतळावर आगमन झालं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, गुरुदास कामत यांनी मुंबई विमानतळावर राहुल गांधी यांचं स्वागत केले.

राहुल गांधी सुरु असलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी ते सकाळी 11 वाजता हजर राहतील. महात्मा गांधींजींची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच घडवून आणली, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिवंडीत केलं होतं.

या वक्तव्याविरोधात आरएसएसचे शहर जिल्हा कार्यवाहक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिक दाखल केली होती.. या सुनावणीनंतर राहुल गांधी गोरेगाव इथं दुपारी 2 वाजता सभा घेणार आहेत.

दरम्यान, 2019मधल्या विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांकडून महाआघाडीचा प्रस्ताव मांडण्यात आलाय, अशी महत्वाची बातमी सूत्रांकडून मिळतेय. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, रिपाई कवाडे,गवई गट, सपा, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि बहुजन विकास आघाडी गटासोबत आघाडीचा हा प्रस्ताव आहे.

Loading...

आघाडीबाबत पवारांनी रविवारच्या वर्धापन दिन सोहळ्यात आवाहन केलं होतं. त्यावर राहुल गांधी आणि महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांमध्ये आज चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2018 08:57 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...