'...म्हणून कुटुंबीयही लतादीदींना सतत भेटू शकत नाही', भाची राधा यांनी वाढदिवशी सांगितलं कारण

कोरोनामुळे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा दिनक्रम काय आहे आणि त्या कशी काळजी घेतात हे त्यांची भाची राधा यांनी सांगितलं आहे.

कोरोनामुळे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा दिनक्रम काय आहे आणि त्या कशी काळजी घेतात हे त्यांची भाची राधा यांनी सांगितलं आहे.

  • Share this:
    मुंबई, 28 सप्टेंबर: कोरोनाच्या महासंकटामुळे सर्वत्र एकप्रकारची भीती आणि दहशत आहे. राजकारण्यांपासून ते कला-मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांपर्यंत कोरोनाचा शिरकाव होत असल्याचं दिसत आहे. याच कोरोनाच्या काळात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीनं साजरा केला जात आहे. लता दिदिंना वाढदिवसानिमित्त भेटून शुभेच्छा देणं शक्य नसलं तरीही सोशल मीडियावर चाहते शुभेच्छा देत आहेत. कोरोनामुळे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा दिनक्रम काय आहे आणि त्या कशी काळजी घेतात याबद्दल जाणून घेणार आहोत. कोरोना आणि त्याआधी असलेल्या आजारामुळे लतादीदी या खूप कसोशिनं सोशल डिस्टन्सिंग आणि आपला दैनंदिन काटेकोरपणे पाळतात. त्यांना घरातल्या घरात भेटण्यासाठी देखील मास्क आणि सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगसारख्या गोष्टी अगदी कठोरपणे पाळाव्या लागत असल्याची माहिती त्यांची भाची राधा यांनी दिली आहे. हे वाचा-Lata Mangeshkar Birthday : लतादीदींबाबतचे किस्से! जे तुम्ही कधीही ऐकले नसतील दिव्य मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राधा यांनी माहिती दिली आहे. राधा म्हणतात, 'कोरोनाचा संसर्ग वाढण्याआधीच लता मंगेशकर या मोठ्या आजारातून नुकत्याच बऱ्या झाल्या होत्या. या आजारामुळे त्यांच्या वेळापत्रकात बराच बदल झाला. कोरोनाचं संकट आणि वयामुळे काही बंधन अधिक आली. पथ्यपाणी, औषध आणि सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम आम्ही पाळतो. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कुटुंबातील मंडळीही त्यांना सतत भेटू शकत नाहीत. भेटायचे असेल तर मास्क अनिवार्य असतो. त्यांची औषधे, नर्सिंग, विश्रांती हे सांभाळून सगळ्यांना वागावं लागतं.' हे वाचा-निकोलस पूरनच्या जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा हा VIDEO मिस केला तर लगेच पाहा कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे प्रभुकुंज इमारत काही दिवसांपूर्वी सील करण्यात आली होती. आमच्या घरात 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे अनेक जण असल्यामुळे सर्वात जास्त काळजी घ्यावी लागते. घरातील सदस्य आणि अन्य मदतनीस कुणालाच बाहेर जाऊ देत नाही. गेल्या 6 महिन्यांच्या काळात आम्ही घरातच लतादीदींची गाणी ऐकतो. कोरोनाचा संसर्ग टाळाण्यासाठी आम्ही 6 महिन्यांपासून बंद आहोत. या काळात लतादीदींची गाणी जगण्याला उभारी देतात प्रत्येकवेळी त्यांच्या गाण्यांमधून नवीन काहीतरी मिळत राहातं अशी भावना लतादीदींची भाची राधा यांनी व्यक्त केली आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published: