S M L

नोटांसाठी पुन्हा रांगा पण...

Sachin Salve | Updated On: Mar 30, 2017 09:44 PM IST

नोटांसाठी पुन्हा रांगा पण...

30 मार्च : ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा बदलून देण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं सर्वसामान्यांना ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिल्याच्या अफवेमुळे आरबीआयच्या मुख्यालयाबाहेर आज (गुरुवारी) सकाळपासून लोकांची गर्दी झाली होती. फक्त मुंबईतीलच नाही तर जळगांव, अहमदनगर, पुणे येथूनही अनेकजण नोटा बदलण्यासाठी मुंबईत आले होते.

नोटबंदीनंतर 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून हद्दपार झाल्यात. पण, सरकारने दिलेल्या 2 महिन्यांच्या कालावधीत लोकांना जुन्या नोटा बदलून घेता आल्या नाहीत. अनिवासी भारतीयांना जुन्या नोटा बदलून नव्या नोटा मिळवण्याची मुदत उद्या म्हणजेच ३१ मार्चला संपत असल्याचा पार्श्वभूमीवर इतर सर्वसामान्य भारतीय नागरिकांनीही नोटा बदलून मिळतील असं समजून आरबीआयसमोर रांगा लावल्या ध्या ऊत आला आहे.

जुन्या नोटा बदलण्याच्या तारखेत वाढ केल्याची खोटी पोस्ट गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टची खातरजमा करण्यासाठी काही नागरिक थेट आरबीआयचे मुख्यालयच गाठतायंत पण त्यांच्या हाती फक्त निराशाच पडते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 30, 2017 09:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close