S M L

डोंबिवलीजवळ स्फोटकांचा मोठा साठा जप्त

तब्बल १९९ जिलेटीनच्या कांड्या, १०० डिटोनेटर्सचा आणि 2 कट्टे समावेश होता.

Sachin Salve | Updated On: Apr 16, 2018 11:07 PM IST

डोंबिवलीजवळ स्फोटकांचा मोठा साठा जप्त

डोंबिवली, 16 एप्रिल : डोंबिवलीजवळच्या खोणी गावात स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. ठाणे क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने ही कारवाई केलीये.

2 इसम स्फोटकांचा साठा घेऊन येणार असल्याची माहिती क्राईम ब्रँचला मिळाली होती. त्यानुसार रविवारी संध्याकाळच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून दुचाकीवरून आलेल्या दोघांना ताब्यात घेतलं. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडील बॅगमध्ये स्फोटकांचा मोठा साठा आढळून आला. ज्यात तब्बल १९९ जिलेटीनच्या कांड्या, १०० डिटोनेटर्सचा आणि 2 कट्टे समावेश होता.

ही स्फोटकं बाळगण्याचा कुठलाही परवाना त्यांच्याकडे नसल्यानं हा साठा जप्त करत पोलिसांनी या दोघांना अटक केली. अशोक ताम्हणे आणि मारुती धुळे अशी या दोघांची नावं असून ते रायगड जिल्ह्यातल्या कर्जतचे राहणारे आहेत.

हा साठा त्यांनी नेमका कशासाठी आणला होता? आणि या दोघांचा दहशतवादी किंवा नक्षलवादी कारवायांशी संबंध आहे का? याचा तपास सध्या क्राईम ब्रँचच्या वतीनं सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2018 11:07 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close