अटलजीं'च्या स्मारकासाठी भूखंड हडपला? सरकारनं दिलं हे उत्तर!

अटलजीं'च्या स्मारकासाठी भूखंड हडपला? सरकारनं दिलं हे उत्तर!

'माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं स्मारक तयार करण्यासाठी कुठलाही भूखंड हडपला नाही.'

  • Share this:

मुंबई 13 सप्टेंबर : माजी प्रधानमंत्री भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मारक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकांच्या धर्तीवर मुंबईत उभारण्यात येईल असे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पात घोषित केले होते. मात्र हे स्मारक तयार करण्यासाठी कोणताही भूखंड हडप करण्यात आलेला नसल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. माजी पंतप्रधान वाजपेयी यांचे स्मारक तयार करण्याबाबत दीनदयाळ उपाध्याय समितीने अर्ज केला होता. मात्र हे स्मारक तयार करण्यासाठी जे अर्ज करतील त्या सर्व अर्जांची छाननी मंत्रीमंडळ उपसमितीमार्फत केली जाणार आहे. मंत्रीमंडळ उपसमितीने दिलेल्या अहवालानंतरच कोणत्या ठिकाणी स्मारक करावयाचे याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. असंही त्यांनी स्पष्ट केलं.

SPECIAL REPORT : विधानसभा अध्यक्षांची राजीनामा सर्व्हिस, आले थेट बाईकवरून!

पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मारक करण्यासाठी राज्य शासनासमोर सध्या तरी स्मारकासाठी 4 जागा डोळयासमोर आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटर जवळील जागा, बालभवन येथील एक जागा आणि उपनगरातील दोन जागा डोळयासमोर आहेत. मात्र अदयाप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे माध्यमांमध्ये पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मारकासाठी भूखंड हडप केल्याची बातमी वस्तुस्तिथीदर्शक नाही त्यामुळे  चुकीच्या बातम्या पसरवू नये असे आवाहन तावडे यांनी केले.

मित्राने केलेल्या विनयभंगाबद्दल गर्लफ्रेंडचा खुलासा, प्रियकराने दोस्ताला संपवलं

'मनसे'चं तळ्यात मळ्यात

लाव रे तो व्हिडीओ असं म्हणत लोकसभा निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी उडविणाऱ्या राज ठाकरे यांची तोफ विधानसभा निवडणुकीत धडाडणार का? याबाबत सध्या संभ्रम निर्माण झालाय. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर आज नेत्यांची बैठक बोलवली होती. मात्र ही बैठक कुठल्याही निर्णयाविनाच संपली. विधानसभा निवडणुकीबाबात काय भूमिका घ्यायची हे राज ठाकरे लवकरच सांगतील अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. त्यामुळे राज ठाकरे निवडणूक लढणार नाहीत अशी चर्चा सुरू झालीय.

'विक्रम'च्या शोधात असलेल्या NASA च्या ऑर्बिटरनं टिपलेत पावलांचे ठसे!

या बैठकीनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी माहिती देताना सांगितलं की, बैठकीत काही कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवावी आणि काही कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवू नये अशी भूमिका मांडली. राज ठाकरे यांनीही आपले विचार व्यक्त केलेत. आता काय निर्णय घ्यायचा हे राज ठाकरे ठरवणार असून लवकरच ते आपला निर्णय जाहीर करतील अशी माहिती नांदगावकर यांनी दिली.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 13, 2019, 8:36 PM IST

ताज्या बातम्या