यंदा राजाचं विराजमान नाही, लालबागच्या राजा मंडळाचा मोठा निर्णय

यंदा राजाचं विराजमान नाही, लालबागच्या राजा मंडळाचा मोठा निर्णय

यंदाच्या गणेशोत्सवातील ११ दिवस लालबागमध्ये महारक्तदान शिबीर आणि प्लाझ्मा थेरपीसाठी प्लाझ्मा दान मोहीम सुरू करणार आहे.

  • Share this:

मुंबई, 01 : जुलै : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी गणेशोत्सव साजरा केला जाणार नाही, अशी घोषणा लालबाग राजाच्या मंडळाने केली आहे.

महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणजे वारी आणि गणेशोत्सव या दोन्ही महाउत्सवावंर यंदा कोरोना संसर्गाचं विघ्नं आलंय. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा मोठ्या जल्लोषात उत्सव साजरा करण्यावर निर्बंध आले आहे. गणेशोत्सवात महाराष्ट्रातील सर्वात मोठं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे ते मुंबईचं लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. या मंडळाची कार्यकारणी सभा काल पार पडली. या कार्यकारणीने यंदाच्या गणेशोत्सवा संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला. यंदा गणेशोत्सव साजरा करणार नाही, असं मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.

महिंद्रा Electric ची मोठी घोषणा, लवकरच लाँच करणार 3 इलेक्ट्रिक वाहनं!

यंदा उत्सव मूर्तीची स्थापना न करता आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. यंदाच्या गणेशोत्सवातील ११ दिवस लालबागमध्ये महारक्तदान शिबीर आणि प्लाझ्मा थेरपीसाठी प्लाझ्मा दान मोहीम सुरू करणार आहे. मंडळाकडून ११ दिवस रक्तदान शिबीरासोबतच प्लाझ्मादान शिबीरही आयोजित करण्यात येणार आहे.

टिकटॉकवर बंदी! सरकारच्या निर्णयाविरोधात या महिला खासदाराने केला सवाल

तसंच देशाच्या सीमेवर शहीद होणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांसाठीही मोठी मदत लालबागचा राज गणेशोत्सव मंडळ करणार आहे. कोरोना विषाणुंचा संसर्ग सुरू असल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव लालबागचा राजा मंडळ आरोग्य उत्सव म्हणून साजरा करून सामाजजिक बांधिलकी जपणार आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: July 1, 2020, 10:31 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading