लालबागच्या राजाला निरोप; पुढच्या वर्षी लवकर या

लालबागच्या राजाला निरोप; पुढच्या वर्षी लवकर या

लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवर उत्तर आरती करण्यात आली. कोळी बांधवांनी बोटींवरून सलामीही देण्यात आली.

  • Share this:

मुंबई,6 सप्टेंबर: अनेक भक्तांचे श्रद्धास्थान असलेला मुंबईच्या प्रतिष्ठित लालबागच्या राजाला  भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला आहे. मिरवणूक  लालबागचा राजाची  अरबी समुद्रात विसर्जन करण्यात आलं आहे.

ही मिरवणूक काल सकाळी मार्गस्थ झाली होती. जवळपास 24  तास ही मिरवणूक चालू होती. लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवर उत्तर आरती करण्यात आली.  कोळी बांधवांनी बोटींवरून सलामीही दिली. आता लवकरच विशेष तराफ्यावरून लालबागच्या राजाचं अरबी समुद्रात कोळी बांधवांनी विसर्जन केलं. अरबी समुद्रात लालबागच्या राजाच्या विसर्जन तराफ्यावर अनंत मुकेश अंबानी उपस्थित होते.

आज सकाळी सातपर्यंत मुंबईत 6943 सार्वजनिक, 33228 घरगुती, 188 गौरी अशा एकूण 40419 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. अजूनतरी कोणत्याही दुर्घटनेची माहीती नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2017 08:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading